advertisement

Chandrayaan 3 - इंडिया! इंडिया!! पृथ्वीवर IND VS PAK Match, भारताने चंद्रावर केली सेंच्युरी; पाहा हा PHOTO

Last Updated:

भारत-पाकिस्तान मॅच सुरू होताच चंद्रावरूनही चांद्रयान 3 बाबत आलेली नवी अपडेट इस्रोने दिली आहे.

चांद्रयान 3
चांद्रयान 3
नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : आज एशिया कप सामन्यात भारत-पाकिस्तानची मॅच सुरू आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पृथ्वीवर पाकिस्तानविरोधात मॅच खेळणाऱ्या भारताने चंद्रावरही सेंच्युरी मारली आहे. चांद्रयान 3 बाबत नवीन अपडेट समोर आली आहे. इस्रोने चांद्रयान 3 बाबत नवी माहिती दिली आहे. ज्यात सेंच्युरीचा उल्लेख करण्यात आला आहे. आता ही सेंच्युरी कसली हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
23 ऑगस्टनंतर आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा. आज भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना. तसंच भारताच्या सौरमोहिमेचंही लाँचिंग होतं. एकिकडे सूर्ययान आदित्य एल 1 सूर्याच्या दिशेने झेपावलं. तर दुसरीकडे भारत-पाकिस्तान मॅचही सुरू झाली. त्यातच आता चंद्रावरूनही आनंदाची बातमी आली आहे. चांद्रयान 3 च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर सेंच्युरी मारली आहे. आता प्रज्ञानने सेंच्युरी मारली म्हणजे नेमकं काय केलं?
advertisement
तर इस्रोने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर १०० मीटर प्रवास पूर्ण केला आहे. त्याचा प्रवास अजूनही सुरू आहे. ज्यावेळी इस्रोला ही अपडेट मिळाली त्याचवेळी इंडिया-पाक मॅचही सुरू झाली. त्यामुळे हीच वेळ साधत इस्रोनेही चांद्रयानबाबत अगदी क्रिकेट शैलीत अपडेट दिली.
advertisement
‘चांद्रयान-3’ च्या लँडर आणि रोव्हरला नाव कसं दिलं?
‘चांद्रयान-3’च्या लँडरचं नाव ‘विक्रम’ आणि रोव्हरचं नाव ‘प्रज्ञान’ ठेवण्यात आलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ही नावं देण्यामागील कारण काय आहे? ‘चांद्रयान-3’च्या रोव्हरला ‘प्रज्ञान’ असं नाव देण्यात आलं आहे, ज्याचा अर्थ ‘बुद्धिमता’ असा होतो. रोव्हरला हे नाव देण्यात आलं, कारण शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, चंद्राच्या पृष्ठभागावरील अनेक गोष्टींची माहिती गोळा करण्यासाठी रोव्हरला त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो.
advertisement
‘चांद्रयान-3’च्या लँडरला डॉ. विक्रम साराभाई यांचं नाव देण्यात आलं आहे. विक्रम साराभाई यांना भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक म्हटलं जातं. ‘विक्रम’ या शब्दाचा अर्थ धैर्य आणि शौर्याशी जोडलेला आहे.
23 ऑगस्टला  चांद्रयान 3  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालं. यानंतर चंद्रावर लँड करणारा भारत जगातील चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Chandrayaan 3 - इंडिया! इंडिया!! पृथ्वीवर IND VS PAK Match, भारताने चंद्रावर केली सेंच्युरी; पाहा हा PHOTO
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement