2 प्रश्नांची उत्तरं चुकीची कशी? रेकॉर्डब्रेक मार्क्स मिळवणाऱ्या JEE टॉपरचा IIT ला सवाल

Last Updated:

शिक्षकांनी एखादा जरी गुण कापला, तर तो का कापला म्हणून आजोबांचं डोकं खाणाऱ्या वेदनं आत्ताही त्याच्या दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची का ठरवली, माझ्या दोन प्रश्नांमध्ये काय चुकलं, अशी विचारणा त्याने आयआयटीकडे केली आहे.

वेद लाहोटी
वेद लाहोटी
नवी दिल्ली : जेईई- अॅडव्हान्समधील आतापर्यंतच्या सर्व टॉपर्सचा रेकॉर्ड मोडणारा वेद लाहोटी. 360 पैकी 355 गुण त्याला मिळाले. आता सामान्यपणे इतके गुण मिळाल्यानंतर कुणीही आनंदी, समाधानी होईल. पण इतके गुण मिळूनही वेद मात्र समाधानी नाही. त्याने जे गुण गमावले त्या दोन प्रश्नांची उत्तरं चुकीची कशी अशी विचारणा आयआयटीला केली आहे.
मूळचा इंदूरचा असलेला वेद ज्याची आई जया गृहिणी आहेत, तर वडील योगेश बांधकाम व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. वेदला दहावीला 98.60 टक्के, तर बारावीला 97.60 टक्के मार्क्स होते. गेली सात वर्षे तो जेईईची तयारी करत होता. जेईई-मेनमध्ये त्याला 300 पैकी 295 तर जेईई- अॅडव्हान्समध्ये 360 पैकी 352 गुण मिळाले होते. पण मग जे गुण कापले त्या दोन प्रश्नांची उत्तर चुकीची कशी असा सवाल त्याने आयआयटीला केला.
advertisement
वेद लाहोटीचा आयआयटीला सवाल
लहानपणापासून कुठल्याही गोष्टीवर लॉजिकल उत्तर शोधण्याची सवय असलेला वेद परीक्षेत लिहिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराबाबतही काटेकोर असे. म्हणून शिक्षकांनी एखादा जरी गुण कापला, तर तो का कापला म्हणून आजोबांचं डोकं खाणाऱ्या वेदनं आत्ताही त्याच्या दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची का ठरवली, माझ्या दोन प्रश्नांमध्ये काय चुकलं, अशी विचारणा आयआयटीकडे केली.
advertisement
आयआयटीने पुन्हा त्याची उत्तरपत्रिका तपासली असता. आधी चुकीच्या सांगितलेल्या दोन प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर बरोबर होतं. यामुळे त्याचे तीन मार्क्स वाढले. त्याला 360 पैकी 355 गुण मिळाले. हे जेईई- अॅडव्हान्समधील आत्तापर्यंतचे सर्वाधिक गुण आहेत.
स्मार्टवर्कवर भर
स्मार्टवर्कवर वेदचा भर राहिला आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन करत तडजोड करणं त्याला मान्य नाही. गणित आणि भौतिकशास्त्र हे त्याचे आवडते विषय, तर चेस आणि क्रिकेट हे त्याचे आवडते खेळ आहेत. त्याला वाचन आवडतं. नवनवीन विषयांवर वाचायला त्याला आवडतं.  त्याला टीव्ही, चित्रपट पाहायला आवडत नाही. ऑलिंपियाड स्पर्धेतही त्याने अव्वल कामगिरी केली आहे.  दहावीनंतर जेईईच्या तयारीसाठी त्याने कोटाची निवड केली.  अजूनतरी इंजिनिअरिंगच्या कुठल्या शाखेला किंवा कुठल्या संस्थेत प्रवेश घ्यायचा हे त्यानं निश्चित केलेलं नाही.
मराठी बातम्या/Viral/
2 प्रश्नांची उत्तरं चुकीची कशी? रेकॉर्डब्रेक मार्क्स मिळवणाऱ्या JEE टॉपरचा IIT ला सवाल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement