Kitchen Jugaad Video : टॉयलेटमध्ये चाकूची कमाल, इंडियन-वेस्टर्न दोन्हीसाठी फायद्याचा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Tips In Marathi : चाकू तुम्ही कधी टॉयलेटमध्ये वापरून पाहिला आहे का? टॉयलेटमध्ये चाकू वापरण्याचा मोठा फायदा. टॉयलेटमध्ये चाकू वापण्याचा असा परिणाम की तुम्ही विचारही केला नसेल.
नवी दिल्ली : चाकू, सुरी याचा वापर आपण सामान्यपणे किचनमध्ये करतो. भाजी, कांदा, टोमॅटो असे पदार्थ कापण्यासाठी, चिरण्यासाठी चाकू-सुरीचा वापर करतो. पण हाच चाकू तुम्ही कधी टॉयलेटमध्ये वापरून पाहिला आहे का? टॉयलेटमध्ये चाकू वापरण्याचा मोठा फायदा. टॉयलेटमध्ये चाकू वापण्याचा असा परिणाम की तुम्ही विचारही केला नसेल.
चाकूचा टॉयलेटमध्ये वापराचा जबरदस्त असा किचन जुगाड व्हिडीओ. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आता चाकूचा टॉयलेटमध्ये काय फायदा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नेमकं काय करायचं आहे ते आपण पाहुयात.
advertisement
टॉयलेटच्या काही भागावर विशेषतः वेस्टर्न टॉयलेटच्या मागच्या बाजूला खाली जो पाईप असतो त्यावर तुम्हाला सिमेंटसारखं काहीतरी दिसेल. इथं तुम्ही हार्पिक टाका आणि ब्रशने घासा तरी ते निघणार नाही. महिलेनं व्हिडीओ ते दाखवलं आहे. पण हाच भाग तुम्ही चाकू किंवा सुरीनं घासला तर ते सहज निघतं. टॉयलेट पांढरंशुभ्र दिसतं. अशाच पद्धतीनं कमोडचा खालचा भाग तोसुद्धा टॉयलेट क्लिनर टाकून स्वच्छ होत नाही, बिलकुल जात नाही. इथंसुद्धा तुम्ही चाकूने घासून पाहा आणि मग कमाल बघा.
advertisement
महिलेनं व्हिडीओत सांगितल्यानुसार तिनं हे करताना टॉयलेट क्लिनर टाकलेलं नाही. टॉयलेट क्लिनर न टाकता फक्त चाकूनं घासून तिनं टॉयलेट स्वच्छ केलं आहे. अशाच पद्धतीने टॉयलेटमधील कोपरेही स्वच्छ करता येतील असं या महिलेनं सांगितलं आहे. तुम्ही इंडियन टॉयलेटमधील कोपरे अशापद्धतीने स्वच्छ करू शकता.
advertisement
टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी जो चाकू तुम्ही वापरणार आहात तो वेगळा ठेवा, त्याचा वापर किचनमध्ये करू नका असा सल्ला महिलेनं दिला आहे. Unik Vlogger युट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
Location :
Delhi
First Published :
June 11, 2025 3:54 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : टॉयलेटमध्ये चाकूची कमाल, इंडियन-वेस्टर्न दोन्हीसाठी फायद्याचा