Kitchen Jugaad : फ्रिजला टॉयलेट क्लिनर लावताच कमी होईल लाइट बिल; कसं ते पाहा VIDEO

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : उन्हाळ्यात फ्रिजचा वापर वाढतो. परिणामी लाइट बिलही जास्त येतं. पण फ्रिजला टॉयलेट क्लिनर लावून लाइट बिल कसं कमी करायचा जबरदस्त जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे.

News18
News18
नवी दिल्ली : हार्पिक म्हणजे टॉयलेट क्लिनर. ज्याने आपण टॉयलेट स्वच्छ करतो. पण तुम्ही कधी हार्पिक फ्रिजला लावून पाहिलं आहे का? टॉयलेटप्रमाणे हार्पिकने फ्रिजमध्येही कमाल करून दाखवली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण टॉयलेट चकाचक करणारं हार्पिक फ्रिजला लावल्याने तुमचं लाइट बिल कमी होईल. एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडचा व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे.
फ्रिज म्हटलं की लाइट बिल आलंच. वारंवार फ्रीज उघडल्याने फ्रीजच्या आतील तापमानावर फरक पडतो आणि फ्रीजला आतील तापमान थंड ठेवण्यासाठी वीजही जास्त लागते. परिणामी लाईट बिल जास्त येतं. पण आता फ्रीजमुळे लाईट बिल वाढण्याचं टेन्शनच नाही. कारण हार्पिक वापरल्याने फ्रिजमुळे जास्त येणारं तुमचं लाइट बिल कमी होईल. आता हे कसं शक्य आहे, त्यासाठी हा व्हिडीओ पाहा.
advertisement
तुम्ही पाहिलं असेल अनेकदा फ्रीजचा दरवाजा उघडायला गेल्यावर तो पटकन उघडतो किंवा किंचितसा उघडा राहतो. दरवाजा नीट लागत नाही. ज्यामुळे त्यातील थंड हवा बाहेर पडते. अशा परिस्थितीत फ्रीजला गॅस बनवण्यातही जास्त वीज लागते, त्याच्या कम्प्रेसरवर परिणाम होतो. आता फ्रीजचा दरवाजा नीट न लागण्याचं कारण म्हणजे दरवाजावर असलेला रबर. ज्याला गॅसकीट म्हणतता. तुम्ही नीट पाहाल तर नव्या फ्रीजमधील रबर थोडा फुगीर असतो. पण तो जुना झाला की हा रबर चिकटतो. त्याच्यात घाणही साचते. ज्यामुळे दरवाजा नीट लागत नाही.
advertisement
त्यामुळे हा रबर स्वच्छ करण्याची गरज आहे. पण तो असा सहजासहजी स्वच्छ होत नाही. त्यामुळे तुम्ही हार्पिकचा वापर करा.  एका भांड्यात हार्पिक घेऊन एका जुन्या टुथब्रशच्या मदतीने ते फ्रिजच्या रबरमध्ये घासा. संपूर्ण रबर असा स्वच्छ करून घ्यायचा आहे. यामुळे रबरमध्ये असलेली सर्व घाण स्वच्छ होईल. काही मिनिटांतच रबर नव्यासारखा चकचकीत होईल आणि तुम्ही दरवाजा बंद करून पाहिला तर तो आधीपेक्षा घट्ट लागेल. त्यातील थंड हवा बाहेर येणार नाही आणि फ्रिजला आतील तापमान थंड ठेवण्यासाठी जास्त वीज लागणार नाही. साहजिकच यामुळे तुमचं लाइट बिलही कमी होईल.
advertisement
सिम्पली मराठी युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad : फ्रिजला टॉयलेट क्लिनर लावताच कमी होईल लाइट बिल; कसं ते पाहा VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement