Jugaad Video : पावसात लाइट गेली, मिक्सर बिघडला तरी टेन्शन नाही; फक्त एका प्लॅस्टिक बाटलीत वाटा मसाला
- Published by:Priya Lad
Last Updated:
पाणी, कोल्डड्रिंकच्या प्लॅस्टिक बाटल्या आपण सामान्यपणे फेकून देतो. पण त्यात मसालाही वाटता येतो, हे तुम्हाला माहिती होतं का? या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली : बरेच लोक जेवणात कांदा-खोबऱ्याचं वाटण घालतात. आलं, लसूण, मिरची याची पेस्ट वापरतात. वाटण असो वा पेस्ट ती बनवण्यासाठी लागतं ते मिक्सर किंवा ग्राइंडर. मग मिक्सरशिवाय तुम्हाला असा मसाला वाटता येईल तेसुद्धा प्लॅस्टिक बाटलीत असं सांगितलं तर... साहजिकच तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
वाटण करण्यासाठी किंवा मसाला वाटण्यासाठी पूर्वी पाटा-वरवंट्याचा वापर व्हायचा. आता पाटा-वरवंट्याची जागा मिक्सर-ग्राइंडरनं घेतली आहे. पण काही वेळा असं होतं की मिक्सर बिघडतो किंवा अचानक लाइट जाते आणि मसाला वाटायचा असतो. काही जणांच्या घरात पाटा-वरवंटा आजही आहे पण सर्वांनाच तो वापरता येतो असं नाही किंवा रात्रीचा अंधार असेल तर या पाटा-वरवंट्यावरही मसाला वाटणं म्हणजे मुश्कील. अशावेळी काय करायचं?
advertisement
अशावेळी तुमच्या कामी येईल ती फक्त एक प्लॅस्टिकची बाटली. पाणी किंवा कोल्डड्रिंकची प्लॅस्टिकची रिकामी बाटली तर प्रत्येकाच्या घरात असतेच. सामान्यपणे ही बाटली आपण फेकून देतो. पण या बाटलीत मसाला वाटता येऊ शकतो, असं सांगितलं तर साहजिकच तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता ते कसं शक्य आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
प्लॅस्टिक बाटलीत कसा वाटायचा मसाला?
तुम्हाला करायचं काय आहे तर बाटलीला मधून कापा. आता आलं, लसूण, कांदा, मिरची या बाटलीत टाका आणि वरून लाटणीनं ठेचा. हा तुमचा एक प्रकारचा खलबत्ता तयार झाला आहे. आलं, लसूण, कांदा, मिरची अशा मसाल्याचा वाटण तुम्ही या प्लॅस्टिक बाटलीत करू शकता. लाईट गेली, मिक्सर बिघडला तर आयत्यावेळी तुम्हाला हा जुगाड कामी येईल.
advertisement
इथं पाहा व्हिडीओ
Pal pal real vlog युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. हा जुगाड तुम्ही करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
सूचना : हा व्हिडीओ सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही न्यूज18मराठी याची खातरजमा करत नाही.)
Location :
Delhi
First Published :
August 01, 2024 1:19 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Jugaad Video : पावसात लाइट गेली, मिक्सर बिघडला तरी टेन्शन नाही; फक्त एका प्लॅस्टिक बाटलीत वाटा मसाला