Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये एक वाटी जरूर ठेवा; आहे मोठा फायदा

Last Updated:

फ्रिजमध्ये एक वाटी ठेवण्याचा असा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल. हा जबरदस्त असा किचन जुगाड आहे.

किचन जुगाड (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली : उन्हाळा म्हटलं की फ्रिजचा वापर जरा जास्तच वाढतो. पण फ्रिजसंबंधी एक समस्या ती म्हणजे यातून येणारा वास. काही वेळा फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खराब होतात आणि त्याचा वास येऊ लागतो. हा वास फ्रिजभर पसरतो, फ्रिज उघडताच हा वास येऊ लागतो. आता हा वास घालवायचा कसा असा प्रश्न असतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमची ही समस्या फक्त एका वाटीनं दूर होईल.
वाटीनं फ्रिजमधील दुर्गंधी घालवण्याचा जबरदस्त असा किचन जुगाड एका महिलेनं दाखवला आहे. या जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आता वाटीनं फ्रिजची दुर्गंधी कशी काय घालवायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण ते पाहण्याआधी फ्रिजमध्ये वास येऊच नये, यासाठी आधी काय काळजी घ्यायची ते पाहुयात.
advertisement
फ्रिजमध्ये दुर्गंध येऊ नये म्हणून काय करावं?
पदार्थ टिकवण्यासाठी आपण फ्रिजमध्ये ठेवतो. पण काही वेळा हे पदार्थ बराच कालावधी राहतात आणि त्यानंतर ते खराब होतात. त्यातून वास येतो. हा वास फ्रिजभर पसरतो. फ्रिज उघडताच याचा वास बाहेर येतो. त्यामुळे शक्यतो पदार्थ जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नका. ते वारंवार तपासत राहा.
दुसरं म्हणजे ऋतुप्रमाणे फ्रिजचं टेम्प्रेचर सेट करा. सध्या उन्हाळा सुरू आहे. यावेळी फ्रिजचं तापमान 3 ते 5 मध्ये ठेवा. यामुळे अन्नपदार्थ खराब झाले तरी त्यातून दुर्गंधी येणार नाही आणि त्यातील बॅक्टेरियाही पसरणार नाही. शक्यतो जास्त कालावधी अन्नपदार्थ ठेवू नका.
advertisement
तिसरं म्हणजे अन्नपदार्थ बंद डब्यात ठेवा. ज्यामुळे ते खराब झालं तरी त्याचा वास बाहेर पसरणार नाही.
वाटीनं कशी दूर करायची फ्रिजमधील दुर्गंधी?
आता आपला महत्त्वाची प्रश्न म्हणजे वाटी ठेवून फ्रिजमधील दुर्गंधी कशी काय दूर होईल. तर या वाटीत तुम्हाला बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि ती वाटी फ्रिजमध्ये ठेवायची आहे. ही वाटी तीन महिने तुम्ही फ्रिजमध्ये अशीच ठेवू शकता नंतर त्यातील बेकिंग सोडा बदला.
advertisement
यामुळे फ्रिजमध्ये काहीही खराब झालं तर त्याचा वास फ्रिजमध्ये पसरणार नाही, इतर पदार्थांना त्याचा वास लागणार नाही. फ्रिजमध्ये येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी तो दररोज स्वच्छ करण्याची गरज नाही. बेकिंग सोड्याने ही दुर्गंधी दूर होऊ शकते.
या वाटीत तुम्ही बेकिंग सोड्याऐवजी कॉफीही ठेवू शकता. पण कॉफीचा वास खूप स्ट्राँग असतो, त्यामुळे त्याचा वास इतर पदार्थांना लागू शकतो.
advertisement
Prajakta Salve युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये एक वाटी जरूर ठेवा; आहे मोठा फायदा
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement