Kitchen Jugaad Video : पनीर वापरताना त्यात टुथपेस्ट टाका; विचित्र आहे पण याचा मोठा फायदा

Last Updated:

पनीरमध्ये टुथपेस्ट टाकून वापरण्याचा किचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

टुथपेस्ट-पनीरचा किचन जुगाड (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
टुथपेस्ट-पनीरचा किचन जुगाड (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली : पालक पनीर, मटार पनीर, पनीर पुलाव, पनीर टिक्का... एक ना दोन पनीरपासून असे कितीतरी पदार्थ पनीरपासून बनवतात येतात. पनीरचा वापर काही वेळा थेट किंवा काही वेळा थोडे फ्राय करून केला जातो. पण तुम्ही कधी पनीरमध्ये टुथपेस्ट टाकून वापरून पाहिला आहे का?
पनीरमध्ये टुथपेस्ट टाकून वापरण्याचा किचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पनीरचा असा अनोखा. वापर तुम्ही आजवर कधीच केला नसेल.
तुम्हाला करायचं काय आहे, तर कोणताही पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही पनीर आणला की त्याचा छोटासा तुकडा कापून बाजूला ठेवा. हा तुकडा किसणीवर किसून घ्या. आता यात एक चमचा गव्हाचं पीठ टाका. थोडासा लिंबूरस टाका. आता यात टुथपेस्ट टाका. चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण हातानी मिक्स करा.
advertisement
आता या मिश्रणाचं करायचं काय, तर हे मिश्रण तुम्ही हातापायांना लावू शकता. गृहिणी दिवसभर घरच्या कामात व्यस्त असतात. त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. काम करून हात आणि पायांच्याही समस्या उद्भवतात. हातपाय काळे, कोरडे पडतात. अशावेळी हे मिश्रण तुम्हाला कामी येईल.
advertisement
हे मिश्रण लावल्याने तुमचे हातपाय उजळतील आणि मुलायम होतील. मिश्रण लावल्यानंतर हातापायावर चोळून काही वेळाने ते पाण्याने धुवून टाका. याचा रिझल्ट तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता.
हे मिश्रण तोंडाला लावू नका. तोंडाला लावायचं असेल तर यात टुथपेस्ट टाकू नका, असंसुद्धा या महिलेने व्हिडीओत सांगितलं आहे.
advertisement
Didi ye kaise karu युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : पनीर वापरताना त्यात टुथपेस्ट टाका; विचित्र आहे पण याचा मोठा फायदा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement