Kitchen Jugaad : केसाचा कंगवा भाजीवर फिरवा; फक्त एकदा Video पाहा, पुन्हा पुन्हा कराल हा जुगाड
- Published by:Priya Lad
Last Updated:
कंगव्याचा किचनमध्ये भन्नाट असा वापर, या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मुंबई : सामान्यपणे कंगवा आपण केस विंचरण्यासाठी वापरतो. पण कंगव्याचा अनोखा असा वापर एका गृहिणीने केला आहे. या जबरदस्त किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एकदा या जुगाडाचा व्हिडीओ तुम्ही पाहाल तर तुम्हीसुद्धा हा उपाय नेहमी कराल.
कंगव्याचा तुम्ही काय काय वापर करता, असं विचारलं तर साहजिकच कंगवा फक्त केस विंचरण्यासाठीच असतो, आणखी कशासाठी, असं तुम्ही म्हणाल. पण नाही, या कंगव्याचा आणखीसुद्धा वापर आहे. किचनमध्ये हा कंगवा तुमचं मोठं काम हलकं करेल. आता ते कसं. तर केसाचा कंगवा तुम्ही एकदा भाजीवर फिरवून पाहा. मग तुम्हाला याचा परिणाम समजेल.
advertisement
आता नेमकं कंगवा भाजीवर फिरवल्याने काय होतं पाहुयात. व्हिडीओत महिलेने दाखवल्यानुसार तिनं पालेभाजी घेतली आहे. त्यावर ती कंगव्याचे दात फिरवत आहे. म्हणजे केस विंचरावेत तशी ती पालेभाजी विंचरून घेते आहे. तुम्ही व्हिडीओ पाहाल तर पालेभाजीची पानं अगदी सहज निघत आहेत, शिवाय ती बारीकही होते आहे म्हणजे चिरली जाते आहे. एरवी पालेभाजी साफ करणं म्हणजे खूप वेळ जातो. ती मोडा, नंतर चिरा. पण फक्त एका कंगव्याने हे काम सोपं आणि कमी वेळेत होतं.
advertisement
Indian Vlogger Pinki युट्युब चॅनेलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
Delhi
First Published :
February 18, 2024 8:00 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad : केसाचा कंगवा भाजीवर फिरवा; फक्त एकदा Video पाहा, पुन्हा पुन्हा कराल हा जुगाड