Kitchen Jugaad - नवीन झाडू आणताच सर्वात आधी त्याला लॉक लावा; का ते पाहा VIDEO

Last Updated:

झाडू आणि लॉकच्या या किचन जुगाडाचा व्हिडीओ एका गृहिणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

किचन जुगाड
किचन जुगाड
नवी दिल्ली, 20 जून :  आतापर्यंत तुम्ही दरवाजा, बॅग याला लॉक लावलं असेल. घरात कुणी घुसू नये, बॅग कुणी उघडू नये म्हणून सुरक्षेसाठी हे टाळं असतं. पण हेच लॉक तुम्ही कधी झाडूला लावून पाहिलं आहे का? झाडूला लॉक वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. झाडूला लॉक कसं लावायचं आणि त्याचा फायदा काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण झाडूला लॉक लावण्याचा हा किचन जुगाड एका गृहिणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. बऱ्याच गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा लॉक आणि झाडूचा जुगाड. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. झाडूला लॉक लावण्याचा मोठा फायदा आहे. विशेषतः नव्या झाडूला. नवीन झाडू आणताच तुम्ही त्याला न विसरता लॉक लावा. आता हे करायचं कस, याचा काय आणि कसा फायदा आहे ते आपण व्हिडीओत पाहूया. महिलेने व्हिडीओत सांगितल्यानुसार झाडूला एक कॉटन बॅग घालायची आहे. झाडूचा जो खालचा झुपरेदार भाग असतो, ज्याने आपण कचरा काढतो. तो भाग या बॅगमध्ये संपूर्ण झाकला जाईल याची काळजी घ्या.
आता एक लॉक घ्या आणि हा लॉक कॉटन बॅग लावलेल्या झाडूवर लावा. झाडूला लावून हा लॉक त्यावर घासा, लॉकने झाडूवर हळुवारपणे मारा. थोड्या वेळाने अलगद झाडूवरील पिशवी काढा, तुम्ही आत पाहाल तर आत सर्व झाडुचा भुसा दिसेल. नवीन झाडू आणल्यानंतर त्यातून असा भुसा पडतो. बरेच दिवस कचरा काढताना असा भुसा वारंवार पडत राहतो. झाडूमुेळे अधिकच कचरा होतो. अशा वेळी हा उपाय फायद्याचा ठरेल.लॉकने झाडूवर मारल्यावर, लॉक झा़डूवर घासल्यावर झाडूचा भुसा निघून जाईल आणि तुमचा सर्वात मोठा त्रास संपेल.
advertisement
SEEMA FAMILY VLOG युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज लोकमत याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad - नवीन झाडू आणताच सर्वात आधी त्याला लॉक लावा; का ते पाहा VIDEO
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement