Knowledge : नवीन 2 व्हिलर गाड्यांची हेडलाईट नेहमी ON का असते? काय आहे नेमकं कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
असे अनेक टू व्हिलर चालक असतील ज्यांनी मागच्या काही वर्षात गाडी विकत घेतली असेल. त्यांनी ही गोष्ट अनुभवली असेल, अनेकांना या हेडलाईटबद्दल प्रश्न देखील पडला असेल. पण याचं उत्तर मात्र अनेकांना ठावूक नसेल
मुंबई, 28 नोव्हेंबर : तुम्ही घराबाहेर पडलात तर तुम्हाला असंख्य वाहानं दिसतील. ज्यामध्ये टू व्हिलर आणि फोर व्हिलर्स आहेत. पण तुम्ही हल्ली एक गोष्टीकडे लक्ष दिलं का बऱ्याच टू व्हिलरची हेडलाईट ही दिवसा देखील चालूच असते. म्हणजे ही लाईट बंद करण्यासाठी बटण नसतं. गाडी बंद केल्यानंतरच ती लाईट बंद होते. पण असं का?
असे अनेक टू व्हिलर चालक असतील ज्यांनी मागच्या काही वर्षात गाडी विकत घेतली असेल. त्यांनी ही गोष्ट अनुभवली असेल, अनेकांना या हेडलाईटबद्दल प्रश्न देखील पडला असेल. पण याचं उत्तर मात्र अनेकांना ठावूक नसेल आणि आज आम्ही तुम्हाला यासंबंधीत माहिती देणार आहोत.
दुचाकींचे हेडलाईट नेहमी चालू राहण्याचे कारण AHO म्हणजेच तंत्रज्ञानावरील स्वयंचलित हेडलाइट.
advertisement
या तंत्रज्ञानामुळे वाहनांचे दिवे नेहमी चालू राहतात. हे BS-6 वाहनांमध्ये घडते. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे दुचाकी आणि स्कूटरचा आकार बस, ट्रक किंवा कारपेक्षा लहान असतो. यामुळे, धुके किंवा धुक्यासारख्या हवामानात ही वाहने सहसा दिसत नाहीत. अशा परिस्थितीत, जेव्हा त्यांचे दिवे सतत चालू असतात, तेव्हा ते दिसतात. बीएस-6 इंजिनची ही खासियत आहे.
advertisement
दिवसाच्या वेळीही दुचाकी वाहनांमध्ये हेडलाईट लावण्याची व्यवस्था ही रस्ता सुरक्षा मानक आहे, जी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लागू केली आहे. आता तुम्ही म्हणाल की उजेडात या लाईटीचं काय काम. तर उजेड असला तरी देखील लांबून येणाऱ्या गाडीची लाईट आधीच चालकाला दिसते, ज्यामुळे सावध राहाता येतं.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही प्रणाली जगातील विविध देशांमध्ये आधीच लागू केली गेली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 28, 2023 6:23 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Knowledge : नवीन 2 व्हिलर गाड्यांची हेडलाईट नेहमी ON का असते? काय आहे नेमकं कारण







