Video: सफारीत 13 वर्षीय मुलावर चित्त्याचा थरारक हल्ला; सुट्टीसाठी गेला, पंज्यात सापडला- सगळं घडलं क्षणात

Last Updated:

Safari In Bengaluru: बेंगळुरूमध्ये झालेल्या सफारीदरम्यान 13 वर्षीय मुलावर चित्त्याने अचानक झेप घेत पंज्याने हल्ला केला. या घटनेत मुलगा जखमी झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

News18
News18
बेंगळुरू: बेंगळुरूच्या बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्कमध्ये (Bannerghatta Biological Park) झालेल्या सफारीदरम्यान एका १३ वर्षीय मुलावर चित्त्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. सुदैवाने या हल्ल्यातून मुलाचा थोडक्यात बचाव झाला.
ही घटना आज (शनिवारी) दुपारी घडली. १३ वर्षांचा सुहास जो बोम्मासंद्रा येथील रहिवासी आहे. आपल्या पालकांसोबत सुट्टी घालवण्यासाठी सफारी गाडीत होता.
नेमकी घटना काय?
बायलॉजिकल पार्कचे कार्यकारी संचालक सूर्य सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक चित्ता अनपेक्षितपणे सफारी गाडीचा पाठलाग करत होता. अचानक तो गाडीवर उडी मारून त्याने मुलाच्या हाताला ओरखडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये चित्ता सफारी जीपचा पाठलाग करताना दिसत आहे आणि गाडीच्या खिडकीला जाळ्या असूनही तो आपल्या पंजाने हल्ला करत असल्याचे दिसते. चित्त्याच्या पंजांमुळे मुलाच्या हातावर खोलवर ओरखडे उमटले.
advertisement
advertisement
मुलावर उपचार
घटनेनंतर पार्क कर्मचाऱ्यांनी तात्काळ मुलाकडे लक्ष दिले आणि त्याला उपचारासाठी जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर मुलाला डिस्चार्ज देण्यात आला असून तो घरी परतला आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या घटनेची चौकशी केली जात असल्याचे पार्क प्रशासनाने सांगितले आहे.
वाद चर्चेत
बेंगळुरूमध्ये वन्यजीव सफारीसाठी बन्नेरघट्टा प्राणीसंग्रहालय खूप लोकप्रिय आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानाच्या (Bannerghatta National Park) परिसरातील अनेक वाद आणि समस्या चर्चेत आहेत.
advertisement
मानव-प्राणी संघर्ष: अलीकडच्या काळात शहराच्या परिघावरील रहिवासी भागांमध्ये चित्ते आणि हत्ती आल्याच्या घटना वाढल्या आहेत.
शहरीकरण आणि पायाभूत सुविधा: पर्यावरणवाद्यांनी शहरी विस्तारामुळे प्राण्यांच्या कॉरिडॉर्सवर होणारे अतिक्रमण आणि उद्यानाच्या हद्दीजवळ प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचा युक्तिवाद आहे की यामुळे परिसंस्थेला धोका निर्माण होऊ शकतो आणि मानव-वन्यजीव संघर्ष वाढू शकतो.
मराठी बातम्या/Viral/
Video: सफारीत 13 वर्षीय मुलावर चित्त्याचा थरारक हल्ला; सुट्टीसाठी गेला, पंज्यात सापडला- सगळं घडलं क्षणात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement