advertisement

या ठिकाणी ट्रॅफिक लाईट हिरव्या ऐवजी निळी, काय आहे कारण?

Last Updated:

रस्त्यांच्या चौकाचौकात सिग्नल असतात. वाहतुक कोंडी होऊन येऊ नये म्हणून हे रस्त्यावर लावले जातात. तुम्हीही प्रत्येक शहरात सिग्रल पाहिले असतील प्रत्येक सिग्नल तीन रंगांचा असतो.

या ठिकाणी ट्रॅफिक लाईट हिरव्या ऐवजी निळी
या ठिकाणी ट्रॅफिक लाईट हिरव्या ऐवजी निळी
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : रस्त्यांच्या चौकाचौकात सिग्नल असतात. वाहतुक कोंडी होऊन येऊ नये म्हणून हे रस्त्यावर लावले जातात. तुम्हीही प्रत्येक शहरात सिग्रल पाहिले असतील प्रत्येक सिग्नल तीन रंगांचा असतो. ज्यामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा रंग असतो. मात्र एका ठिकाणी असा सिग्नल आहे जिथे हिरव्या ऐवजी निळा रंगाचा सिग्नल असतो. असा सिग्नल कोणत्या ठिकाणी आहे आणि एक रंग वेगळा का लावला आहे याविषयी जाणून घेऊया.
हे ठिकाण जपान आहे. हा देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत अव्वल मानला जातो, मग इथे रंगाच्या बाबतीत एवढी मोठी चूक कशी झाली? खरं तर हा जुन्या परंपरेचा परिणाम आहे. प्रत्येक देशाच्या स्वतःच्या भिन्न श्रद्धा आणि परंपरा आहेत, ज्या शतकानुशतके चालत आलेल्या आहेत.
ही सगळी हेराफेरी जपानी भाषा आणि शब्दांमुळे झाली. शतकानुशतके, जपानमध्ये काळा, पांढरा, लाल आणि निळा या चार मुख्य रंगांसाठीशब्द तयार केले गेले. इथे निळ्या रंगाला AO म्हणतात. जर काही हिरव्याबद्दल बोलायचे असेल तर त्यालाही एओ म्हटलं जातं. म्हणून हा घोळ झाला.
advertisement
ट्रॅफिक लाइट्सबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम जपान सरकारने आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करून सिग्नलसाठी हिरवा रंग निवडला. परंतु जपानच्या अधिकृत रहदारी नियम आणि कागदपत्रांमध्ये, हिरव्या रंगाला Ao म्हणतात. सरकार हिरवा रंग निवडत होते, पण जपानमधील सामान्य लोक आणि भाषा तज्ञ याला विरोध करत होते. त्यांचा असा विश्वास होता की जर जपानच्या नियमांमध्ये एओ रंगांचा वापर आवश्यक असेल तर त्यांनी तसं केलं पाहिजे.
advertisement
आंतरराष्ट्रीय दबाव आणि अंतर्गत दबावादरम्यान प्रशासनाने नवा मार्ग शोधला. 1973 मध्ये त्यांनी पिरोजी रंगाचा लाईट निवडला. त्याचा दिवा हिरवा रंगाचा आहे पण त्याचा प्रकाश निळा पडतो. आज जरी लोक जपानमध्ये निळे ट्रॅफिक लाइट आहेत असे म्हणत असले तरी ते निळे नसून हिरवे आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
या ठिकाणी ट्रॅफिक लाईट हिरव्या ऐवजी निळी, काय आहे कारण?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement