स्टंट करताना डोक्यावर पडला तरुण, दिल्ली मेट्रोतील धक्दादायक Video
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दिल्ली मेट्रो आता मनोरंजनाचं आणि कलांचं एक ठिकाणच झालंय. या ठिकाणी मेट्रोमधील अनेक वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात ज्यामध्ये लोक हटके, विचित्र, गोष्टी करताना दिसून येतात.
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : दिल्ली मेट्रो आता मनोरंजनाचं आणि कलांचं एक ठिकाणच झालंय. या ठिकाणी मेट्रोमधील अनेक वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात ज्यामध्ये लोक हटके, विचित्र, गोष्टी करताना दिसून येतात. लोक चालू प्रवासात काहीही करतात, अनेकदा प्रवाशांचं मनोरंजन होतं तर कधी या गोष्टींचा लोकांना त्रासही सहन करावा लागतो. सध्या दिल्ली मेट्रोतील एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये तरुण स्टंट करण्याचा प्रयत्न करतो मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत धक्कादायक घडतं.
लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्टंट करताना दिसतात. असाच स्टंट एका तरुणाने चालू मेट्रोमध्ये करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा स्टंट फसला आणि तरुणासोबत धक्कादायक घडलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण चालू मेट्रोमध्ये स्टंट करण्याचा प्रयत्न करतोय. तो ब्लॅक फ्लिप मारतो मात्र त्याचा तोल बिघडतो आणि तो डोक्यावर पडतो. व्हिडीओ पाहूनच समजेल की तरुणाला डोक्याला किती मार लागला असेल. तो डोक्याला खूप जोरात पकडतो.
advertisement
advertisement
chaman_flipper नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेशात हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येत आहेत.
अनेकदा लोक वेगवेगळ्या ठिकाणी असे स्टंट करताना दिसून येतात. गर्दीत असं काही करुन ते लोकांचं लक्ष वेधत असतात तर काही जण प्रसिद्धी झोतात येण्यासाठी अशा गोष्टी करतात. मात्र स्टंट करणं बऱ्याचदा लोकांच्या अंगलट येतं आणि भयानक गोष्टी घडतात. काही वेळा लोक गंभीर जखमी होतात कर काही जण थोडक्यात बचावतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच फिरत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 24, 2023 5:08 PM IST








