4 वर्षांची असताना आले Periods, 5 व्या वर्षीच बनली आई; जगातील सर्वात कमी वयाची ‘मॉम’; हे कसं शक्य?

Last Updated:

निसर्ग कधी कधी इतका अप्रत्याशित वागतो की सर्व ज्ञान थोडं अपुरं पडतं. अशीच एक घटना, जी ऐकली की अविश्वसनीय वाटते, पण इतिहासात ठामपणे नोंदलेली आहे…

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : आपल्या पृथ्वीवर आजही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जगासाठी रहस्यमयी आहेत. कधीकधी अशा काही गोष्टींचं गुड उलगडतं की त्याची आपण कल्पना सुद्धा करु शकत नाही. वैद्यकशास्त्र रोज नवे शोध लावतं, नवी कोडी सोडवतं… पण काही घटना अशा असतात की वर्षांनो-वर्षं गेल्यावरही त्या समजून घेणं कठीणच ठरतं. डॉक्टर, वैज्ञानिक, संशोधक सगळेच एका प्रश्नाचं उत्तर शोधत राहतात, पण निसर्ग कधी कधी इतका अप्रत्याशित वागतो की सर्व ज्ञान थोडं अपुरं पडतं. अशीच एक घटना, जी ऐकली की अविश्वसनीय वाटते, पण इतिहासात ठामपणे नोंदलेली आहे…
1939 साली घडलेली ही घटना आजही जगातील सर्वात मोठ्या मेडिकल मिस्ट्रीपैकी एक मानली जाते. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, केवळ 5 वर्षांच्या वयात लीना मेदीना नावाच्या एका मुलीने निरोगी मुलाला जन्म दिला होता. त्या काळीच काय तर तर, आजही हे सत्य ऐकून लोक थक्क होतात.
लीनाचा पोट असामान्यरीत्या फुगू लागलं तेव्हा कुटुंबाला वाटलं कदाचित ट्यूमर असेल. तिची तपासणी करण्यासाठी तिला पेरूच्या पिस्को शहरातील डॉक्टरांकडे नेलं. पण तपासणीचे निष्कर्ष ऐकताच कुटुंब आणि डॉक्टर दोघेही अवाक झाले ती मुलगी 8 महिन्यांची गर्भवती होती.
advertisement
इतक्या कमी वयात गर्भधारणा? अशक्य वाटणारं हे सत्य मेडिकल डॉक्युमेंट्स, एक्स-रे आणि रेकॉर्ड्सनी सिद्ध केलं.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लीनाला Precocious Puberty नावाची अतिशय दुर्मिळ वैद्यकीय स्थिती होती. यात मुलींमध्ये 8 वर्षांपूर्वीच प्रौढत्वाची शारीरिक चिन्हे दिसू लागतात.
यामध्ये हार्मोन्स जलद सक्रिय होणे, शरीराचा वेगाने विकास होणे, प्रजनन क्षमता लवकर तयार होणे अशी लक्षणं या स्थितीत दिसतात. सुमारे 10,000 पैकी फक्त 1 मुलात ही अवस्था आढळते.
advertisement
लीनाचं शरीर सामान्य प्रसूतीसाठी अजिबात तयार नव्हतं, त्यामुळे डॉक्टरांनी तिचा सी-सेक्शन केला आणि जगाने सर्वात कमी वयाच्या मातेला पाहिलं. बाळाच्या वडिलांची ओळख मात्र कधीच समोर आली नाही. लीना कशी आणि कोणामुळे प्रेग्नेन्ट राहिली हे तिच्या घरच्यांनाही कळू शकलेलं नाही.
ही घटना जगभरात गाजली, पण लीना मात्र प्रकाशझोतात यायला तयार नव्हती. अनेक मोठे ऑफर्स, कार्यक्रम, मुलाखती सगळं तिनं नाकारलं. तिने आपलं आयुष्य अत्यंत साधेपणाने जगलं, आपल्या मुलाचं संगोपन मनापासून केलं.
advertisement
आजही डॉक्टर आणि संशोधक या प्रकरणाचा अभ्यास करतात. इतक्या लहान वयात आई बनण्यामागचं कारण, शरीराने हे कसं स्वीकारलं. हे सगळं अजूनही कोडंच आहे.
इतिहासात अशी आणखी काही आश्चर्यकारक प्रकरणं नोंदलेल्या आहेत:
येलिझावेता (रशिया) इथे 6 वर्षांच्या वयात बाळाला जन्म दिला, पण ही चिमुकली जिवंत राहिली नाही.
मम-झी (नायजेरिया) ही 8 वर्षे 4 महिन्यांची असताना आई बनली. तिच्या मुलानेही लहान वयातच संतानास जन्म दिला आणि त्यामुळे मम-झी जगातील सर्वात कमी वयाची आजी ठरली.
view comments
मराठी बातम्या/Viral/
4 वर्षांची असताना आले Periods, 5 व्या वर्षीच बनली आई; जगातील सर्वात कमी वयाची ‘मॉम’; हे कसं शक्य?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement