10000000000 किमतीचं 'लिक्विड गोल्ड' चोरीला, ट्रक ड्रायव्हरने पळवलं, चोरीची पद्धत पाहून पोलीसही हैराण

Last Updated:

Liquid gold maple syrup heist : चोरीची अशी कहाणी ज्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. सर्वात महागड्या चोरींपैकी ती एक मानली गेली.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
सोन्याच्या किमती लाखोंच्या घरात पोहोचल्या आहेत. गोल्ड रेड वाढत असतानाच लिक्विड गोल्डची कहाणी चर्चेत आली आहे. चोरीची अशी कहाणी ज्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. सर्वात महागड्या चोरींपैकी ती एक मानली गेली. एक ट्रकचालक ज्याने तब्बल 10000000000 किमतीचं लिक्विड गोल्ड चोरलं. आता हे लिक्विड गोल्ड काय आणि ते कसं चोरलं याची संपूर्ण कहाणी पाहुयात.
2011-2012 सालची ही गोष्ट. कॅनडा एक असा देश जो त्याच्या सुंदर नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि मॅपल सिरपसाठी जगभर प्रसिद्ध आहे. कॅनडाचं लिक्विड गोल्ड म्हणून ओळखलं जाणारे मेपल सिरप त्याच्या संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे हे सीरपदेखील चोरीला जाऊ शकतं, तेही इतक्या मोठ्या प्रमाणात की इतिहासात ते 'द ग्रेट कॅनेडियन मेपल सिरप चोरी' म्हणून ओळखलं जातं?
advertisement
कॅनडामधील मेपल सिरप उत्पादनाचं केंद्र असलेलं क्यूबेक. जगातील 70% पेक्षा जास्त मेपल सिरप पुरवतं. हे सिरप साठवण्यासाठी फेडरेशन ऑफ क्यूबेक मेपल सिरप प्रोड्यूसर्स (FPAQ) नावाची एक संघटना स्थापन करण्यात आली, जी सिरपची किंमत आणि पुरवठा नियंत्रित करत असे. या संस्थेचे सेंट-लुईस-डी-ब्लँडफोर्ड इथं एक मोठं गोदाम होतं, जिथं हजारो बॅरल मेपल सिरप सुरक्षित ठेवलं जात होतं. पण या गोदामात ठेवलेलं 'लिक्विड गोल्ड' चोरांच्या नजरेत आले.
advertisement
कशी झाली चोरी?
ही चोरी सामान्य चोरी नव्हती. चोरांनी ही घटना अतिशय हुशारीने घडवली. मुख्य आरोपी रिचर्ड व्हॅलियर्स आणि त्याचे काही साथीदार होते. व्हॅलियर्स हा एक ट्रक ड्रायव्हर ज्याला मेपल सिरप व्यवसायाची चांगली माहिती होती. FPAQ गोदामातील सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या, हे त्याला माहिती होतं.. गोदामात ठेवलेल्या बॅरल्सची वर्षातून एकदाच तपासणी केली जात असे, उर्वरित काळात विशेष देखरेख केली जात नव्हती. व्हॅलियर्स आणि त्याच्या टीमने याच गोष्टीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला.
advertisement
गोदामातून मॅपल सिरपचं बॅरल चोरून ते काळ्या बाजारात विकण्याची त्यांची योजना होती. पण इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी लपवणं सोपं नव्हतं. म्हणून चोरांनी आणखी एक युक्ती खेळली. त्यांनी मॅपल सिरप काढून बॅरलमध्ये पाणी किंवा स्वस्त सिरप भरलं, जेणेकरून गोदामातील बॅरलची संख्या कमी दिसू नये. अशाप्रकारे महिन्यांपर्यंत कोणालाही गोदामातून सिरप गायब होत असल्याचा संशयही आला नाही.
advertisement
चोरी कशी उघड झाली?
2012 मध्ये FPAQ ला गोदामात काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. जेव्हा त्यांनी बॅरल्स तपासायला सुरुवात केली तेव्हा त्यांना आढळलं की अनेक बॅरल्समध्ये मेपल सिरपऐवजी पाणी भरलेलं होतं. तपासात असं दिसून आलं की सुमारे 18.7 दशलक्ष कॅनेडियन डॉलर्स म्हणजे सुमारे 100 कोटी रुपये किमतीचे सुमारे 9600 बॅरल्स मेपल सिरप चोरीला गेले होते. ही चोरी इतकी मोठी होती की ती कॅनडाच्या इतिहासातील सर्वात महागड्या चोरींपैकी एक मानली गेली.
advertisement
पोलिसांनी ताबडतोब तपास सुरू केला. चोरांनी क्युबेकमधून न्यू ब्रंसविक आणि अमेरिकेत सिरपची तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची ही युक्ती फार काळ टिकली नाही. गोदामातील नोंदी, ट्रकची हालचाल आणि काही गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी व्हॅलियर्स आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. या कटात व्हॅलियर्सची पत्नी आणि इतर काही लोकांचाही सहभाग असल्याचं तपासात समोर आलं.
advertisement
7 वर्षे तुरुंगवास
2012 च्या अखेरीस आरोपींना अटक करण्यात आली. खटल्यादरम्यान या प्रकरणाने आणखी बातम्या दिल्या. रिचर्ड व्हॅलियर्स चोरी, फसवणूक आणि कट रचण्यासह अनेक आरोपांमध्ये दोषी आढळला. 2017 मध्ये त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 9.4 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. त्याच्या काही साथीदारांनाही दोषी ठरवण्यात आलं, त्यांना नंतर सोडण्यात आलं. या प्रकरणामुळे मेपल सिरप व्यवसाय आणि FPAQ च्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले.
घटनेवर माहितीपट बनवण्यात आला
या चोरीमुळे क्युबेकच्या मेपल सिरप उद्योगाला मोठा धक्का बसला. FPAQ ला त्यांची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करावी लागली. तसंच या घटनेचा मेपल सिरपच्या किमतींवर परिणाम झाला, कारण बाजारात सिरपचा तुटवडा होता. ही कहाणी इतकी मनोरंजक होती की त्यावर एक पुस्तक लिहिलं गेलं आणि नेटफ्लिक्सने त्यावर 'डर्टी मनी' नावाचा एक माहितीपटही बनवला.
view comments
मराठी बातम्या/Viral/
10000000000 किमतीचं 'लिक्विड गोल्ड' चोरीला, ट्रक ड्रायव्हरने पळवलं, चोरीची पद्धत पाहून पोलीसही हैराण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement