ऐकावं ते नवलंच! 43 वर्षांचा मुलगा, 88 वर्षांची गर्लफ्रेंड; सासऱ्याला बसला धक्का, तर सासू अजूनही...

Last Updated:

प्रेमाला वयाचं बंधन नाही, असं म्हणतात. 43 वर्षीय एड्रियन आणि 88 वर्षीय डेलियाच्या अनोख्या नात्याने हे सिद्ध केलं. वयातील 45 वर्षांच्या फरकामुळे कुटुंबीयांनी या नात्याचा विरोध केला, पण दोघांनी प्रेमासाठी समाजाच्या विरोधाला तोंड दिलं.

News18
News18
प्रेमाचे नाते असे असते की लोक जात, धर्म किंवा वय यांसारख्या गोष्टींकडे न पाहता फक्त एकमेकांच्या हृदयाकडे पाहून भविष्याचा विचार करतात. यामुळेच भारतात असो वा परदेशात, तुम्हाला असे अनेक जोडपे सापडतील ज्यांच्यात वयाचे अंतर खूप जास्त असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडप्याची ओळख करून देणार आहोत, ज्यांना पाहून तुम्हाला त्यांचे नाते काय आहे हे समजू शकणार नाही.
असे म्हणतात की, प्रेमाला वय नसतं. पण जेव्हा कोणी 45 वर्षांच्या वयाच्या अंतराने नातं निर्माण झालेलं असतं तेव्हा कुटुंबाला ते सहन करणे कठीण होऊन बसतं. असेच काहीसे एका जोडप्यासोबत घडले ज्यांची जोडी कोणालाही मान्य नाही. मात्र, त्यांना याचा कोणताही पश्चाताप नाही. ही कथा खूप विचित्र आहे. पण हे जोडपे दावा करते की, ते एकमेकांच्या प्रेमात आहेत.
advertisement
43 वर्षांचा मुलगा, 88 वर्षांची गर्लफ्रेंड
द सनच्या रिपोर्टनुसार, 43 वर्षीय एड्रियन नार्वाएझची गर्लफ्रेंड पाहून लोकांना वाटते की, तो त्याच्या आजीसोबत फिरत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एड्रियन 88 वर्षीय डेलिया लुकेझसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांची पहिली भेट तेव्हा झाली जेव्हा एड्रियन 16 वर्षांचा होता आणि डेलिया 61 वर्षांची होती. 1998 मध्ये एका प्रदर्शनादरम्यान त्यांची भेट झाली आणि त्यांच्यात बऱ्याच गोष्टी समान असल्यामुळे ते मित्र बनले. एड्रियनला शिक्षिका आणि हौशी चित्रकार डेलियाची सर्जनशीलता आवडली आणि काही वर्षांच्या मैत्रीनंतर ते रोमँटिक रिलेशनशिपमध्ये आले. एड्रियन म्हणतो की, त्याला नेहमीच जुन्या गोष्टी आवडत होत्या आणि त्याला असे वाटत होते की, त्याचा जन्म चुकीच्या वेळी झाला आहे.
advertisement
सासूने सुनेला पाहिले, तर डोक्याला हात लावला
सुरुवातीला, जोडप्याने त्यांचे नाते गुप्त ठेवले आणि ते फक्त कधीतरी भेटत असत. मात्र, एक वर्षानंतर त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. एड्रियनच्या वडिलांनी डेलियाला पाहिले तेव्हा त्यांनी कसेतरी ते स्वीकारले. पण आई आपल्यापेक्षा मोठी सून पाहून सहन करू शकली नाही. ती म्हणाली की, तिला काही ऐकायचे आणि बघायचे नाही. तिने दोघांना वेगळे करण्याचाही प्रयत्न केला. पण ते इतके सोपे नव्हते. जोडपे म्हणतात की, ते एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना कोणीही वेगळे करू शकत नाही.
advertisement
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
ऐकावं ते नवलंच! 43 वर्षांचा मुलगा, 88 वर्षांची गर्लफ्रेंड; सासऱ्याला बसला धक्का, तर सासू अजूनही...
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement