भारतातील मॅग्नेटिक हिल, जिथे गाडी स्टार्ट न करताच डोंगरावर चढू लागते! हे कसं घडतं?
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
तुम्हाला अशी कुठली जागा माहीत आहे का, जिथे गाडी स्टार्ट न करता वरच्या दिशेने जाऊ लागते?
नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : उलट्या दिशेनं वाहणाऱ्या नद्या तुम्ही ऐकल्या असतील. भारतातील नर्मदा नदीप्रमाणे. गुजरात आणि मध्य प्रदेशातून जाणारी ही नदी देशातील एकमेव नदी आहे जी उलट वाहते. पण तुम्हाला अशी कुठली जागा माहीत आहे का, जिथे गाडी स्टार्ट न करता वरच्या दिशेने जाऊ लागते? आम्ही वरून खाली जाण्याबद्दल बोलत नाही, आम्ही खालून वर चढून जाण्याबद्दल बोलत आहोत. होय, तुम्ही विचार करत असाल की, अशी जागा कशी असू शकते. तर आम्ही तुम्हाला सांगतो की अशी एक जागा आहे आणि तीही आपल्याच भारतात.
जिथे गोष्टी खाली येण्याऐवजी वर जातात. एवढंच नाही तर अमेरिकेतही अशी जागा आहे. चला जाणून घेऊया त्याची संपूर्ण कहाणी. भारतात हे ठिकाण लडाखच्या टेकड्यांमध्ये आहे, ज्याला मॅग्नेटिक हिल म्हणून ओळखलं जातं. लेह-कारगिल महामार्गावर लेह शहरापासून 30 किलोमीटरवर पोहोचल्यावर तुम्हाला हे ठिकाण सापडेल. इतर डोंगरावर वाहनं वरून खालच्या दिशेने आपोआप जातात, तर इथे मात्र वाहने वरच्या दिशेने जातात. गुरुत्वाकर्षणामुळे येथील वाहनं वरच्या दिशेने खेचली जातात. इथे वाहन सोडल्यास ते ताशी 20 किलोमीटर वेगाने वर जाऊ शकतं
advertisement
लडाखचे लोक म्हणतात की, एकेकाळी येथे एक रस्ता होता जो लोकांना स्वर्गात घेऊन जात होता. तर विज्ञानानुसार, चुंबकीय टेकडीमागे दोन सिद्धांत आहेत. पहिला म्हणजे मॅग्नेटिक फोर्स सिद्धांत आणि दुसरा म्हणजे ऑप्टिकल इल्युजनचा सिद्धांत. मॅग्नेटिक फोर्समुळे एक शक्ती निर्माण होते, ज्यामुळे वाहनं खेचली जातात. अनेकांना असा भासही होतो.
advertisement
तंतोतंत असंच मॅग्नेटिक हिल मॉन्कटनमध्ये आहे. या टेकडीवर चुंबकीय प्रभाव इतका आहे की, गाडी सुरू न होताच पुढे जाऊ लागते. या टेकडीचा शोध 1930 मध्ये लागला होता. या ठिकाणचे रहस्य शोधण्याचे काम अजूनही सुरू आहे. आज हे ठिकाण पर्यटन स्थळ बनले आहे. तज्ञांच्या मते, ही घटना प्रत्यक्षात एक ऑप्टिकल भ्रम आहे. किंबहुना जो रस्ता वरच्या बाजूस जाताना दिसतो तो प्रत्यक्षात मोठ्या उताराचा भाग आहे. यामुळे आपल्या मनात एक भ्रम निर्माण होतो की ते वरच्या दिशेने जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2023 9:28 AM IST
मराठी बातम्या/Viral/
भारतातील मॅग्नेटिक हिल, जिथे गाडी स्टार्ट न करताच डोंगरावर चढू लागते! हे कसं घडतं?