Mahabharat : दुर्योधनाचा जन्म होताच घाबरले होते लोक, म्हणाले, याला जंगलात फेका
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mahabharat story : महाभारतातील व्हिलन दुर्योधनाच्या जन्माचीही एक वेगळीच कथा आहे. त्याचा जन्म कसा झाला हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या जन्मानंतरही भयंकर घडलं होतं.
नवी दिल्ली : महाभारतातील व्हिलन म्हणजे दुर्योधन. त्याचा जन्म झाला तेव्हाच लोक घाबरले होते. दुर्योधनाच्या जन्मानंतर अशा काही विचित्र घटना घडल्या, ज्या आधी कधीच घडल्या नाही आणि लोक घाबरले. ज्योतिषांनी त्याची पत्रिका काढली तेव्हा तेसुद्धा घाबरले. त्यांनी हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्राला आपल्या या मुलाला जंगलात फेकून देण्यास सांगितलं होतं. दुर्योधनाच्या जन्मावेळी नेमकं असं काय घडलं होतं, यामागे एक वेगळीच कथा आहे.
advertisement
दुर्योधनाच्या जन्माची स्टोरी म्हणजे गांधारीला शंभर पुत्र होतील असा आशीर्वाद महर्षी व्यासांनी दिला होता. गांधारी गर्भवतीही झाली. पण 2 वर्षे मूल जन्माला आलंच नाही. त्याचवेळी कुंतीने युधिष्ठिरला जन्म दिला. तेव्हा गांधारीने धृतराष्ट्रला न सांगता आपला गर्भपात करवला आणि लोखंडासारखं कडक मांसाचं पिंड निघालं. ती ते फेकून देत होती पण तेव्हा व्यासांनी तिला थांबवलं. त्यांच्या सल्ल्यानुसार तिनं ते मांसाचं पिंड थंड पाण्यात ठेवलं. त्यातून 101 भ्रूण वेगळे झाले. ते वेगवेगळ्या घड्यात ठेवले. एक वर्षानंतर एका घड्यातून दुर्योधनाचा जन्म झाला.
advertisement
दुर्योधनाच्या जन्मानंतर भयंकर घडलं दुर्योधनचा जन्म होताच तो गाढवासारखा कर्कश आवाजात ओरडू लागला. त्याच वेळी गिधाडं, घुबडं, कोल्हे आणि कावळेदेखील ओरडायला लागले. म्हणजे खूप विचित्र आवाज येऊ लागले. आकाश काळं झालं. अनेक ठिकाणी आग लागली. हे पाहून सगळे घाबरले. धृतराष्ट्र घाबरला.
advertisement
ब्राह्मण आणि ज्योतिष काय म्हणाले?
ब्राह्मण आणि ज्योतिष्यांनी दुर्योधनाचा जन्माचा तो काळ मोजला. त्याला आढळलं की दुर्योधनाचा जन्म इतक्या वाईट वेळी झाला होता की तो संपूर्ण कुळ आणि कुटुंबाच्या विनाशाचं कारण बनेल. यामुळे त्यांच्यात युद्धे आणि संघर्ष होतील. मग ज्योतिषांनी धृतराष्ट्राला या मुलाला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. त्याला जवळ ठेवलं तर संकटं येतील असं त्यांनी सांगितलं. पण धृतराष्ट्राने आपल्या मुलावरील प्रेमामुळे असं करण्यास नकार दिला.
advertisement
खरंच विनाशाची ती भविष्यवाणी खरी ठरली
दुर्योधनाच्या जन्मावेळी करण्यात आलेली भविष्यवाणी खरी ठरली. त्या काळातील ऋषीमुनींनी भाकीत केलं होतं की हे मूल, त्याच्या अहंकार, मत्सर आणि चुकीमुळे एका महायुद्धाला जन्म देईल. ज्यामध्ये हजारो योद्धे मारले जातील. कौरवांचा नाश होईल. शेवटी हेच घडलं. महाभारत युद्ध झालं, कौरवांचा नाश झाला.
advertisement
दुर्योधन हा अनेकदा पांडवांबद्दलच्या त्याच्या अहंकार आणि द्वेषासाठी ओळखला जातो. दुर्योधनाला कलियुगाचा अवतार मानले जाते, ज्यामध्ये कलियुगात स्वार्थासाठी स्वीकारले जाणारे सर्व गुण होते.
Location :
Delhi
First Published :
February 11, 2025 3:03 PM IST