Mahabharat Story : महाभारत काळात कुंतीला दिलेला शाप, आजही भोगत आहेत सर्व महिला
- Published by:Priya Lad
Last Updated:
महाभारतात एक घटना आहे ज्यात माता कुंतीला तिचाच मुलगा युधिष्ठिरने शाप दिल्याचं वर्णन केलं आहे. या शापाचा प्रभाव आजही महिलांवर असल्याचं मानलं जातं.
नवी दिल्ली : महाभारत काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या आजही संस्मरणीय आहेत. महाभारत युद्ध कौरव आणि पांडव यांच्यात झाले. पण तुम्हाला माहित आहे का महाभारत काळात दिलेला एक शाप आजही सर्व महिला भोगत आहेत. युद्धिष्ठरने आपली माता कुंतीला दिलेला हा शाप. हा शाप कोणता आहे, ते जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
महाभारतात एक घटना आहे ज्यात माता कुंतीला तिचाच मुलगा युधिष्ठिरने शाप दिल्याचं वर्णन केलं आहे. या शापाचा प्रभाव आजही महिलांवर असल्याचं मानलं जातं.
काय आहे तो शाप?
कथेनुसार महाभारत युद्ध संपलं तेव्हा माता कुंती कर्णाचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन रडत होती. हे दृश्य पाहून पांडव आश्चर्यचकित झाले. शत्रूच्या मृत्यूवर माता कुंती का रडत आहे, हे पांडवांनी तिला विचारलं. तेव्हा कर्ण आपला मोठा मुलगा असल्याचं तिनं आपल्या मुलांना सांगितलं.
advertisement
हे ऐकून युधिष्ठिरला राग आला आणि त्यानं माता कुंतीला शाप दिला. आजपासून संपूर्ण स्त्री जाती आपल्या पोटात काहीही लपवू शकणार नाही, असं तो म्हणाला. तेव्हापासून हा शाप आजही महिलांना लागू आहे, असं म्हटलं जातं.
कसा झाला होतो कर्णाचा जन्म
महाभारत ग्रंथात सांगिल्यानुसार, एकदा दुर्वासा ऋषी कुंतीच्या सेवेने खूप आनंदित झाले. त्यांनी खुश होऊन कुंतीला एक मंत्र दिला. या मंत्राचा जप करून ज्या देवाची ती आराधना करेल, त्या देवाचा पुत्र तिला प्राप्त होईल, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
या मंत्राचं परीक्षण करण्याचा विचार कुंतीच्या मनात आला. तिने सूर्यदेवाचं आवाहन केलं. सूर्यदेवाकडून तिला कवचकुंडल असलेल्या पुत्राची प्राप्ती झाली. पण लग्नाशिवाय जन्माला आलेलं हे मूल, लोक काय म्हणतील या भीतीनं कुंतीने मुलाला एका डब्यात ठेवून नदीत सोडलं.
Location :
Delhi
First Published :
June 07, 2024 12:06 PM IST