3 हजार खर्च करून मिळवले 796 कोटी रुपये! रातोरात पालटलं तरुणाचं नशीब, असं काय केलं?

Last Updated:

फक्त तीन हजार रुपये गुंतवून त्याने इतके पैसे कमवले की ते मोजणंही कठीण आहे. या व्यक्तीला तीन हजार रुपयांच्या बदल्यात 796 कोटी 22 लाख 63 हजार 904 रुपये मिळाले आहेत.

व्यक्तीने जिंकली लॉटरी
व्यक्तीने जिंकली लॉटरी
नवी दिल्ली : माणसाच्या आयुष्यात पैशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, आजकाल पैशांशिवाय काहीही मिळत नाही. आपल्या आणि कुटुंबियांच्या आयुष्यात सर्व सोयीसुविधा असाव्यात यासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे प्रत्येकाला पैसे कमवण्यासाठी धडपड करावी लागते. काही जणांना अगदी सहज पैसे कमवता येतात तर काहींना त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय संपत्ती मिळणं ही भाग्याची गोष्ट मानली जाते. काही लोकांचं नशीब आपल्या कल्पनेपेक्षाही फारच चांगलं असतं. त्यांच्या पिढ्यानपिढ्या बसून खातील एवढा धनलाभ त्यांना एका झटक्यात होतो.
आपला शेजारी देश असलेल्या चीनमधील अशीच एक नशिबवान व्यक्ती आहे. एक छोटासा व्यवसाय करणाऱ्या या माणसाला भन्नाट कल्पना सुचली. फक्त तीन हजार रुपये गुंतवून त्याने इतके पैसे कमवले की ते मोजणंही कठीण आहे. या व्यक्तीला तीन हजार रुपयांच्या बदल्यात 796 कोटी 22 लाख 63 हजार 904 रुपये मिळाले आहेत.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, या व्यावसायिकाचं वय 28 वर्षे आहे. त्याने 680 मिलियन युआन म्हणजेच 796 कोटी 22 लाख 63 हजार 904 रुपयांची लॉटरी जिंकली आहे. चीनच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा लॉटरी विजय आहे. या व्यक्तीची ओळख उघड करण्यात आलेली नाही. ती गुझोऊ (Guizhou) प्रांतातील रहिवासी आहे. चायना वेल्फेअर लॉटरीने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीने लॉटरीची एकूण 133 तिकिटं खरेदी केली होती. त्यापैकी एका तिकिटाची किंमत दोन युआन म्हणजेच 23 रुपये होती.
advertisement
अशा परिस्थितीत सर्व तिकिटांची किंमत तीन हजार रुपयांपेक्षा थोडी जास्त झाली. त्याला प्रत्येक तिकिटावर 5.16 मिलियन युआन म्हणजेच 725,000 डॉलर्स (भारतीय चलनात 6,01,42,520 रुपये) बक्षीस मिळालं.
भविष्यातील पिढ्या बसून खातील
या लॉटरीचा निकाल सात फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. आयकर नियमांनुसार, या व्यक्तीला त्याच्या एकूण बक्षीस रकमेपैकी एक पंचमांश रक्कम कर म्हणून सरकारकडे जमा करावी लागेल. असं असूनही त्याच्याकडे इतके पैसे शिल्लक असतील की त्याच्या अनेक पिढ्या काहीही काम न करता बसून खाऊ शकतील. या व्यक्तीचं म्हणणं आहे की, रात्री मोबाईलवर या विजयाबद्दलची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला झोप येत नव्हती. सुरुवातीला त्याचा विश्वास बसला नाही. अनेक वेळा पडताळणी केल्यानंतर त्याचा विश्वास बसला.
मराठी बातम्या/Viral/
3 हजार खर्च करून मिळवले 796 कोटी रुपये! रातोरात पालटलं तरुणाचं नशीब, असं काय केलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement