पतीचं घरातील मोलकरणीवर जडलं प्रेम; नवऱ्याच्या आनंदासाठी पत्नीनं जे केलं ते पाहून पोलीसही थक्क
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
महिलेचे कुटुंबीय तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पतीवर खूप प्रेम असल्याचं सांगत ती तिच्या निर्णयावर ठाम आहे
लखनऊ : एखादी विवाहित स्त्री स्वतःच्या पती जवळ दुसरी स्त्री आलेलंही सहन करू शकत नाही. एवढचं काय, तर काही महिला स्वतःच्या पतीबद्दल इतक्या पझेसिव्ह असतात की, त्यांना त्यांच्या पतीशी दुसऱ्या महिलेनं बोललेलं देखील चालत नाही. पण उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेनं तिच्या पतीचं परिसरात राहणाऱ्या सर्वात सुंदर मुलीशी लग्न करून देण्याचा निर्णय घेतलाय. ‘आज तक’ने या बाबत वृत्त दिलंय.
सहारनपूर येथे ठाणे बाजार परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं स्वतःच्या पतीचं पुन्हा लग्न लावून देण्याचा निर्णय घेतलाय. महिलेचे कुटुंबीय तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पतीवर खूप प्रेम असल्याचं सांगत ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. या बाबत महिलेनं सांगितलं की, ‘माझा नवरा काही दिवसांपासून खूप अस्वस्थ होता. मी त्याला कारण विचारलं असता, त्याने सुरुवातीला ते सांगण्यास टाळाटाळ केली. पण जेव्हा मी त्याला आमच्या दोघांच्या मुलाची शपथ घेण्यास सांगितलं, तेव्हा त्याने मला तो अस्वस्थ का आहे, याचं कारण सांगितलं आणि तो रडू लागला. तेव्हा मी त्याची समजूत काढली. मला माझ्या पतीने सांगितलं की, त्याचं एका मुलीवर खूप प्रेम असून, त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. तो तिच्याशिवाय जगू शकणार नाही, असंही माझ्या पतीनं मला सांगितलं आहे.’
advertisement
दुसऱ्या महिलेशी पतीचा कसा आला संपर्क?
संबंधित महिलेच्या पतीचा दुसऱ्या महिलेशी कसा संपर्क आला, हे देखील आता समोर आलं आहे. ही महिला काही दिवसांपूर्वी आई झाल्याचं सांगण्यात येतंय. तिच्या बाळंतपणात तिची सेवा आणि घरातील इतर कामं करण्यासाठी तिच्या घरामध्ये एक तरुणी आली होती. ही तरुणी काहीकाळ सदर महिलेच्या घरी राहिली. या काळात महिलेचा पती त्या तरुणीवर प्रेम करू लागला. जोपर्यंत ती तरुणी महिलेच्या घरी राहत होती, तोपर्यंत सर्वकाही व्यवस्थित चालू होतं; पण जेव्हा ती तरुणी त्यांच्या घरातून गेली, तेव्हा महिलेचा पती नैराश्यात गेला. हा सर्व प्रकार पतीने पत्नीला सांगितल्यावर स्वतःच्या पतीला काहीतरी होईल, या विचारानं ती अस्वस्थ झाली. त्यानंतर तिने परिसरातील सर्वांत सुंदर मुलीचं घर गाठलं आणि त्या मुलीच्या कुटुंबाशी स्वतःच्या पतीच्या लग्नाची बोलणी सुरू केली.
advertisement
पोलीस ठाण्यापर्यंत गेलं प्रकरण
जेव्हा संबंधित महिलेनं मुलीच्या घरामध्ये जाऊन तिच्या कुटुंबीयांशी स्वतःच्या पतीच्या लग्नाची बोलणी केली, तेव्हा कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. ते तिच्यावर संतापले, त्यांनी महिलेला घरातून हाकलून दिलं. त्यानंतर संबंधित महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठलं. ती पोलिसांना म्हणाली की, ‘माझ्या पतीचे त्या मुलीशी लग्न झालं नाही, तर तो खूप नैराश्यात जाईल. हे मी कोणत्याही परिस्थितीत सहन करू शकणार नाही. कृपया त्या मुलीशी माझ्या पतीचं लग्न करून द्या.’ हे ऐकून पोलिसही चकित झाले. पोलिसांनी महिलेला खूप समजावून सांगितलं. पण ती स्वतःच्या निर्णयावर ठाम आहे.
advertisement
दरम्यान, हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्याची चर्चा सहारनपूर परिसरात सुरू आहे. यामध्ये नेमकी पतीची चूक आहे की पत्नीची, यावरूनही चर्चा रंगू लागली आहे.
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
February 22, 2024 1:47 PM IST
मराठी बातम्या/Viral/
पतीचं घरातील मोलकरणीवर जडलं प्रेम; नवऱ्याच्या आनंदासाठी पत्नीनं जे केलं ते पाहून पोलीसही थक्क


