काहीच न करता मुलगी होणार करोडपती; आईने लेकीसाठी शोधली अशी भन्नाट ट्रिक
- Published by:Priya Lad
Last Updated:
मुलीचा जन्म होताच तिच्या आईने तिला करोडपती बनवण्याचा प्लॅन केला आहे, जो तिनं इतरांसोबतही शेअर केला आहे.
नवी दिल्ली : आपल्या मुलांचं भविष्य चांगलं असावं, त्यांना चांगलं आरामात आयुष्य जगता यावं, जो त्रास आपल्याला सहन करावा लागला, ज्या संकटाचा सामना आपल्याला करावा लागला तो आपल्या मुलांना करायला लागू नये, असं प्रत्येक पालकाला वाटतं. आपल्या मुलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी त्यांच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी पालक धडपड असतात. अशीच एक महिला जिनं आपल्या मुलीचा जन्म होताच असं काही केलं की काहीच न करता ती मुलगी करोडपती होणार आहे.
लॉरा अस्कानी असं या महिलेचं नाव आहे. ती लोकांना आर्थिक बाबतीच सल्ले देते. काही महिन्यांपूर्वीच ती आई झाली. तिनं एका मुलीला जन्म दिला आहे. ती म्हणते की तिला तिच्या मुलीला करोडपती बनवायचं आहे, यासाठी मुलीला एक रुपयाही गुंतवण्याची गरज नाही. आता ते कसं, याची माहिती तिनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.
advertisement
लॉराने सांगितलं की तिनं तिच्या पतीसोबत कस्टोडियल ब्रोकरेज अकाऊंट उघडलं आहे. इन्व्हेस्टोपीडियानुसार, पालक किंवा नातेवाईक मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे खातं उघडू शकतात. ते प्रौढ होईपर्यंत त्यांच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवू शकतात. अशा प्रकारे मुलांनाही गुंतवणूक करायला शिकवलं जातं. या खात्याच्या माध्यमातून लॉरा दरमहा 8 हजार रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं तिनं सांगितले. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्याकडे 45 लाख रुपये असतील. ती 60 वर्षांची झाल्यावर तिच्याकडे 24 कोटी रुपये असतील.
advertisement
अनेकांनी लॉराचा हा व्हिडीओ टिकटॉकवर पाहिल्यानंतर या खात्याबद्दल अधिक माहिती विचारली आहे. लॉरा परदेशात राहते. त्यामुळे साहजिकच तिनं गुंतवणुकीसाठी निवडलेला मार्ग भारतीयांना अवलंबणं शक्य नाही. पण भारतीयांना म्युच्युअल फंड, मुदत ठेवी, युलिप योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी इत्यादीमध्ये गुंतवणूक करता येईल. भारतात असलेल्या गुंतवणूक पर्यायांचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलांना करोडपती बनवू शकता.
Location :
Delhi
First Published :
February 22, 2024 1:18 PM IST