चोरीच्या डेबिट कार्डने घेतलं लॉटरीचं तिकीट; जिंकला 42 कोटी रूपये, पण शेवटी झाला 'मोठा गेम'

Last Updated:

चोरांना वाटलं की लॉटरी जिंकली तर पैसे आपल्या खात्यात येतील. मात्र, त्यांच्या नशिबात यातील एक रूपयाही लिहिलेला नव्हता. त्यांनी लॉटरी जिंकली खरी, पण..

42 कोटी जिंकले पण एक रूपयाही मिळाला नाही (प्रतिकात्मक फोटो)
42 कोटी जिंकले पण एक रूपयाही मिळाला नाही (प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली : कोणाचं नशीब कधी आणि कसं बदलेल हे सांगू शकत नाही. तुम्ही लोकांना अनेकदा म्हणताना ऐकलं असेल, की नशिबात असलं तर एखादा माणूस रातोरात करोडपती बनतो. पण नशिबात नसलं की तो अगदी एका रात्रीत रस्त्यावरही येतो. एकंदरीतच हा सगळा नशिबाचा खेळ असल्याचं लोकांचं म्हणणं असतं. एका व्यक्तीसोबत अगदी अशीच घटना घडली. हे प्रकरण जाणून तुम्हीही थक्क व्हाल. चोरांनी एका व्यक्तीचं डेबिट कार्ड चोरी केलं. यानंतर त्यांनी याच कार्डवरुन लॉटरीचं तिकीट खरेदी केलं.
चोरांना वाटलं की लॉटरी जिंकली तर पैसे आपल्या खात्यात येतील. मात्र, त्यांच्या नशिबात यातील एक रूपयाही लिहिलेला नव्हता. त्यांनी लॉटरी जिंकली खरी, पण पूर्ण रक्कम डेबिट कार्डच्या खऱ्या मालकालाच मिळाली आणि तो करोडपती झाला. द सनच्या रिपोर्टनुसार, बोल्टनचे रहिवासी जॉन-रॉस वॉटसन आणि मार्क गुडराम यांनी लॉटरीची तिकिटं खरेदी करण्यासाठी चोरी केलेल्या बँक कार्डचा वापर केला. लॉटरीचा निकाल आल्यावर ते आनंदाने नाचू लागले. दोघांनी 4 मिलियन पौंड म्हणजेच 42 कोटींचा जॅकपॉट जिंकला होता. एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे, ज्यामध्ये वॉटसन नाचताना आणि उडी मारताना दिसत आहे. मार्क गुडरामही अगदी आनंदात दिसत आहे. पण त्यांचा आनंद काही क्षणातच संपला.
advertisement
मार्क गुडराम यानी लॉटरीचे पैसे घेण्यासाठी दावा दाखल केला तेव्हा प्रकरण वेगळं वेगळ्याच वळणावर पोहोचल्याचं समोर आलं. मार्कचं कोणतंही बँक खातं नसल्याचं उघड झालं. जर त्याचं बँक खातं नाही, तर त्याने तिकीट खरेदी करण्यासाठी कोणाचं बँक कार्ड वापरलं? अशा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतरच लॉटरी अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी चौकशी सुरू केली. तपासादरम्यान गुडरामने तिकीट खरेदीसाठी वापरलेले कार्ड जॉन नावाच्या मित्राचं असल्याचं सांगितलं. त्याने सांगितलं, की जॉनकडे माझे काही पैसे होते. यासाठी त्याने त्याचं कार्ड घेतलं होतं, त्यामुळे जॉनच नाव दिलं नसल्याचं मार्कने म्हटलं.
advertisement
तपासात मात्र आणखी खळबळजनक बाबी समोर आल्या. या दोघांनी ज्या कार्डने लॉटरीची तिकिटं खरेदी केली होती ते कार्ड जॉनचं नसल्याचं समोर आलं आहे. हे चोरीचं डेबिट कार्ड होतं, जे प्रत्यक्षात जोशुआ नावाच्या व्यक्तीचं होतं. त्याचाच वापर करून चोरट्यांनी तिकीट खरेदी केलं. आपण फसणार याची त्यांना खात्री नव्हती. नंतर दोघांनीही बराच गदारोळ केला, पण आपण चुकीचे आहोत हे त्यांना माहीत असल्याने त्यांनी फारसा विरोध केला नाही. नंतर दोघांनाही प्रत्येकी 18 महिने तुरुंगवास भोगावा लागला.
view comments
मराठी बातम्या/Viral/
चोरीच्या डेबिट कार्डने घेतलं लॉटरीचं तिकीट; जिंकला 42 कोटी रूपये, पण शेवटी झाला 'मोठा गेम'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement