extra marital affair : 2 मुलांच्या आईचे विवाहबाह्य संबंध, पोलिसांकडे केली अनोखी मागणी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
relationship news - 2015 मध्ये सुनीताचे लग्न हे डूंगरगढ येथील रहिवासी तरुणासोबत झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. तर तिचा प्रियकर हा 24 वर्षांचा असून त्याचे बीए पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तसेच त्याचेही दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे.
नरेश पारीक, प्रतिनिधी
चूरू - गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधांच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यातून हत्या, आत्महत्येचेही प्रकार समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रेम आंधळे असते, हा प्रत्यय पुन्हा एकदा या घटनेने समोर आला आहे. दोन मुलांची आई असेलल्या एका विवाहित महिलेचे एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध झाले आणि यानंतर आता या दोघांना सोबत राहायचे आहे, अशी मागणी या महिलेने केली. यासाठी त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि सुरक्षेची मागणी केली आहे.
advertisement
राजस्थानच्या चूरू राज्यात ही घटना घडली. यातील तरुण हा राजलदेसर येथील तर त्याची प्रेयसी विवाहित महिला ही सरदारशहर येथील रहिवासी आहेत. भालाराम असे या प्रियकराचे नाव आहे. तर सुनिता हे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे.
भालाराम आणि सुनीता यांचे आजोळ हे बरडासर येथील आहे. याठिकाणी दोन वर्षांपूर्वी दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता या दोघांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे.
advertisement
सुनीताचे सासर हे डूंगरगढ हे आहे आणि तिचे प्रियकरांच्या या विवाहबाह्य संबंधांना विरोध आहे. तसेच या दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
2015 मध्ये सुनीताचे लग्न हे डूंगरगढ येथील रहिवासी तरुणासोबत झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. तर तिचा प्रियकर हा 24 वर्षांचा असून त्याचे बीए पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तसेच त्याचेही दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे.
advertisement
सुनीता आणि भालारामच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती भालरामच्या पत्नीला मिळताच ती त्याला सोडून माहेरी चालली गेली. हरियाणातील हांसी येथे लिव्ह-इनची कागदपत्रे त्यांनी तयार केली असून आता त्या दोघांना एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आता पोलीस यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Churu,Rajasthan
First Published :
November 29, 2024 3:27 PM IST
मराठी बातम्या/Viral/
extra marital affair : 2 मुलांच्या आईचे विवाहबाह्य संबंध, पोलिसांकडे केली अनोखी मागणी


