वटपौर्णिमेआधी पुरुषांकडून कावळापूजन, केली अजब प्रार्थना, कारणही विचित्र
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pimpalpurnima before Vatpurnima : वटपौर्णिमेआधी कावळापूजन करत पुरुषांनी अजब प्रार्थना केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरुषांनी केलेल्या कावळापूजनाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अविनाश कानडजे/छत्रपती संभाजीनगर : मंगळवारी 10 जूनला वटपौर्णिमा आहे. सुवासिनी महिला वटपौर्णिमेच्या तयारीला लागल्या आहेत. असं असताना दुसरीकडे मात्र वटपौर्णिमेच्या आधी 9 जूनला पुरुषांनी मात्र कावळापूजन केलं आहे. वटपौर्णिमेआधी कावळापूजन करत पुरुषांनी अजब प्रार्थना केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरुषांनी केलेल्या कावळापूजनाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आपल्याला 7 जन्मी हाच पती मिळावा, त्याला उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना वटपौर्णिमेला महिला करतात. पण पुरुषांनी त्याआधी पिंपळपौर्णिमा साजरी करत कावळापूजन करत याच्या उलट प्रार्थना केली आहे. पुरुषांनी पिंपळाला फेऱ्या मारल्या आहेत. बायकोच्या त्रासाला कंटाळून पत्नीपीडित पुरुषांनी हे पाऊल उचललं आहे.
advertisement
महिलांकडून होणारे अत्याचार, महिलांकडून होणारा त्रास पुरुष कुठेच सांगू शकत नाही आणि अशा घटना मोठ्या वाढल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील पुरुषांनी साजरी केली पिंपळपौर्णिमा. pic.twitter.com/PgT7kwGaVQ
— News18Lokmat (@News18lokmat) June 9, 2025
यामुळे छत्रपती संभाजी नगरातील पत्नीपीडित पुरुष आश्रमाने ही बायको सात जन्म काय तर सात सेकंदही नको असे म्हणत पिंपळाला फेऱ्या मारत कावळ्याचे पूजन केलं आहे. त्रास देणाऱ्या बायकांचा विरोध केला आहे. पिंपळाला फेरी मारून त्रास देणारी बायको सात जन्म तर काय 7 सेकंदही नको यासाठी पत्नीपीडित पुरुषांनी प्रदक्षिणा मारल्या.
Location :
Maharashtra
First Published :
June 09, 2025 11:13 AM IST