Viral Video : स्कूटरवर बसून उडाला हवेत, पॅराग्लाइडिंग करताना व्यक्तीचा हटके Video
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगात असे अनेक हौशी, धाडसी, साहसी लोक आहेत ज्यांना काहीतरी हटके, विचित्र, अनोखं करायला आवडतं. असे अनेक लोक तुम्हाला सापडतील. सोशल मीडियावरही अशा लोकांचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात.
नवी दिल्ली, 18 डिसेंबर : जगात असे अनेक हौशी, धाडसी, साहसी लोक आहेत ज्यांना काहीतरी हटके, विचित्र, अनोखं करायला आवडतं. असे अनेक लोक तुम्हाला सापडतील. सोशल मीडियावरही अशा लोकांचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आलाय ज्यामध्ये एक व्यक्ती चक्क स्कूटरवर बसून पॅराग्लाइडिंग करतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
चित्रपटाच्या सीनलाही लाजवेल असा सीन सध्या व्हायरल होतोय. एक व्यक्ती स्कूटरवर बसून हवेत उडताना दिसला. खरंतर तो अशा हटके प्रकारे पॅराग्लाइडिंग करताना आढळला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्कूटरवर बसलेल्या या व्यक्तीला हवेत उडताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. अनेकांनी या पॅराग्लायडरचा संपूर्ण व्हिडिओ बनवला जो इंटरनेटवर येताच व्हायरल झाला. हिमाचल प्रदेशातील बंदला धारमध्ये हा प्रकार पहायला मिळाला, हर्ष असं या व्यक्तीचं नाव आहे ज्यानं हे धाडस केलं.
advertisement
advertisement
हर्ष हा प्रशिक्षित पॅराग्लायडर आहे आणि तो बऱ्याच दिवसांपासून काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत होता. हर्ष हा पंजाबचा असून हे काम पूर्ण करण्याच्या एकमेव उद्देशाने तो बंदला धार येथे आला होता. त्यानं आपली इलेक्ट्रॉनिक स्कूटर पॅराग्लायडरला बांधली आणि स्कूटरवर बसून हवेत उड्डाण केले. पॅराग्लायडर ठराविक वजनानेच उडू शकत असल्यानं हर्षने स्कूटरमधून बॅटरी काढली होती.
advertisement
दरम्यान, हर्षचं हे धाडस पाहून सर्वच थक्क झालेत. उंचावर अशी स्टंटबाजी पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. हा काही सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2023 5:32 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : स्कूटरवर बसून उडाला हवेत, पॅराग्लाइडिंग करताना व्यक्तीचा हटके Video