Petrol Pump : तुम्ही पण पेट्रोल भरताना फक्त 'झिरो'कडे लक्ष देता का? मग थांबा! पेट्रोल पंपावर नेहमी लक्षात ठेवा '2-3-5 थेअरी'
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंतर मीटर '0.00' दाखवत असला तरीही पेट्रोल पंपांवर फसवणुकीचे प्रकार अजूनही सुरूच असतात. अगदी तुम्ही सतर्क असलात तरी डोळ्यांदेखत इंधन चोरी होऊ शकते.
मुंबई : आपण अनेकदा गाडीत इंधन भरायला जातो आणि सवयीने विचारतो "मीटर झिरो आहे का?" किंवा आपल्याला कर्मचाऱ्याकडून झिरो बघायला सांगितला जातो, तो झिरो पाहिला की आपण निश्चित होतो. कारण आपल्याला वाटतं की मीटर शून्यावरून सुरू झाला, की फसवणुकीचा प्रश्नच उद्भवत नाही. पण हे खरंच इतकं सोपं आहे का?
खरंतर मीटर '0.00' दाखवत असला तरीही पेट्रोल पंपांवर फसवणुकीचे प्रकार अजूनही सुरूच असतात. अगदी तुम्ही सतर्क असलात तरी डोळ्यांदेखत इंधन चोरी होऊ शकते.
'झिरो' असूनही होते फसवणूक!
फसवणूक करणारे काही पंप कर्मचारी अत्यंत शिताफीने काम करतात. उदाहरणार्थ, मीटर झिरोवरून सुरू झाल्यावर काही वेळा तो थेट 5-6 रुपयांवर थांबतो आणि तिथून पेट्रोल भरणं सुरू केलं जातं. हे इतक्या क्षणात होतं की लक्ष न दिल्यास तुम्ही ते सहज चुकवता.
advertisement
पण याचं सगळ्यात सामान्य उदाहरण म्हणजे – "₹100, ₹200, ₹500 चं पेट्रोल भरून द्या" असं सांगणं. अनेक पंपांवर ‘प्रीसेट’ ट्रिक वापरली जाते. म्हणजेच, मशीनमध्ये आधीच रक्कम टाकलेली असते आणि फसवणूक इथेच होते.
मग काय करावं? लक्षात ठेवा ‘2-3-5 थेअरी’
पेट्रोल पंपावर फसवणुकीपासून वाचण्यासाठी एक सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे लिटर मोजून पेट्रोल भरवणं.
advertisement
यालाच आपण म्हणतो ‘2-3-5 थेअरी’ –
म्हणजेच पेट्रोल पैशांमधून नाही तर लिटरमध्ये भरायला सांगा.
"2 लिटर द्या",
"3 लिटर द्या",
"5 लिटर द्या"
यामुळे तुम्ही ‘प्रीसेट’ फसवणुकीपासून वाचू शकता आणि नेमकं किती पेट्रोल टाकलं गेलंय, याचं स्पष्ट मोजमाप करता येतं.
आणखी काही गोष्टी लक्षात ठेवा
नेहमी विश्वासार्ह आणि चाचणी घेतलेला पेट्रोल पंप निवडा.
advertisement
जेथे शक्य असेल तिथे डिजिटल रिसीट मागा.
जर फसवणूक झालीच, तर त्याच वेळी पंप मॅनेजर किंवा कंपनीच्या हेल्पलाईनवर तक्रार करा.
टोल फ्री क्रमांक:
Indian Oil: 1800 2333 555
HP: 1800 2333 555
BPCL: 1800 22 4344
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 23, 2025 9:30 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Petrol Pump : तुम्ही पण पेट्रोल भरताना फक्त 'झिरो'कडे लक्ष देता का? मग थांबा! पेट्रोल पंपावर नेहमी लक्षात ठेवा '2-3-5 थेअरी'