advertisement

Hotel Bhagyashree: नाद करतीय का? भाग्यश्री हॉटेलच्या मालकाच्या अपहरण प्रकरणाला नवे वळण, पोलिसांनी वेगळाच व्यक्त केला संशय, मडकेंनीच सांगितलं

Last Updated:

 रील स्टार भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके अपहरण व हल्ला प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. 2 दिवस उलटूनही पोलिसात गुन्हा नोंद न झाल्याने नागेश मडके कमालीचे अस्वस्थ झाले आहे.

(hotel bhagyashree dharashiv)
(hotel bhagyashree dharashiv)
धाराशिव : नाद करतीय का? असं म्हणून अल्पावधीत महाराष्ट्रात फेमस झालेले धाराशिवमधील भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके आता या ना त्या प्रकारामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. अलीकडेच मडके यांनी हॉटेलबाहेर सेल्फी काढायला आललेल्या तरुणांनी आपलं अपहरण केलं आणि मारहाण करून फेकून दिलं होतं, असा आरोप केला होता. आता मात्र, त्यांच्या या कृत्यावर पोलिसांनी वेगळाच संशय व्यक्त केला असून शस्त्र परवाना देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मडके आता ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
रील स्टार भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके अपहरण व हल्ला प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. 2 दिवस उलटूनही पोलिसात गुन्हा नोंद न झाल्याने नागेश मडके आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले होते.  कालपासून शहर पोलीस स्टेशन ला पाठ पुरावा करून देखील गुन्हा दाखल न करता केवळ अ दखल पात्र गुन्हा करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी पोलिसांनी सांगत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपच मडके यांनी केला आहे.
advertisement
'त्यांचं म्हणणं आहे, बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी तुम्ही हे सगळं केलं आहे. त्यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचं सांगितलं. आम्ही सांगितलं की, मला बंदूक लावून उचलून नेलं. एक तोळ्याची सोन्याची चेन नेली. त्या दिवशी मी शुद्धीवर नव्हतो. मला दुनियाचा मार लागला होता. पोलिसांनी एनसी तक्रार दाखल करतो म्हणून सांगितलं पण आम्हाला एफआयआरच दाखल करायची आहे, अशी मागणीच मडकेंनी लावून धरली.
advertisement
तसंच, 'आम्ही आधी पोलीस स्टेशनला गेलो होतो. आता आम्ही एसपी ऑफिसला आलो होतो. पण त्यांनी काही वेळ दिला नाही. पोलीस म्हणाले की, तुम्ही बंदूक मिळवण्यासाठी न्यूज दिली, पण आम्ही असं काही केलं नाही. आम्ही अडाणी माणसं आहोत. आमच्यावर जे अत्याचार झाले, जी घटना घडली त्याची सत्य माहिती द्याला आलो होतो. जर गुन्हा दाखल झाला नाहीतर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहे. नाहीतर लेकरं बाळं घेऊन आत्मदहन करणार आहे, असा इशाराच नागेश मडकेंनी दिला. पोलिसांनी मात्र, नागेश मडके यांच्या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.
advertisement
काय घडलं होतं नेमकं? 
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२३) साययंकाळी घडला होता. मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सात ले सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हॉटेल भाग्यश्री समोर उभे होते. त्यावेळी तिथे एक चारचाकी गाडी आली आणि त्यांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. सेल्फी काढण्यासाठी ते जवळ गेले असता, त्यांना तसंच गाडीत ओढण्यात आलं. गाडीमध्ये असणाऱ्या पाच जणांनी मडके यांना गाडीमध्ये जबर मारहाण केली, असा  आरोप मडके यांनी केला.
advertisement
तर, 'ही गाडी धाराशिवकडे घेऊन जात पाच किलोमीटर अंतरावर फेकून दिलं, अपहरण करणाऱ्यांकडून मडके यांना जीवे मारण्याचा डाव रचला होता, असा आरोप नागेश मडके यांच्या पत्नीने केला असून पाच जणांच्या या टोळीने मडके यांना जबर मारहाण करून वडगाव (सि.) येथील पुलावर फेकून दिलं. मडके यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून सदर घटना सांगितल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. याप्रकरणी अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला हेही विशेष आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Hotel Bhagyashree: नाद करतीय का? भाग्यश्री हॉटेलच्या मालकाच्या अपहरण प्रकरणाला नवे वळण, पोलिसांनी वेगळाच व्यक्त केला संशय, मडकेंनीच सांगितलं
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement