अजगरासोबत खेळण्याची चुक करुन बसला आणि धक्कादायक प्रकार घडला, पाहा Video
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अजगराशी संबंधित एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती अजगराला धरून सतत त्रास देत आहे.
मुंबई : साप आणि अजगराला लोक घाबरतात, पण त्यांच्याबद्दलचे व्हिडीओ पाहायला अनेकांना फार आवडतं. वन्य आणि धोकादायक प्राण्यांबद्दल जाणून घ्यायला उत्सुकता असते. यासंबंधीत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.
अजगराशी संबंधित एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती अजगराला धरून सतत त्रास देत आहे. या प्रसंगाचा व्हिडीओही बनवला जात आहे. अजगर अचानक त्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा संपूर्ण क्षण श्वास रोखून पाहण्यासारखा आहे.
बहुतेक लोक सापासारख्या प्राण्यांना घाबरतात, तर काही लोक त्यांना खेळणी बनवतात. या व्हिडीओतही तेच पाहायला मिळत आहे. त्या व्यक्तीने अजगराला हातात धरले आहे. अजगर हल्ला करण्याच्या संधीची वाट पाहत असतो. व्यक्तीने पकड सोडताच अजगर हल्ला करतो आणि या व्यक्तीचं तोंड पकडतो. अनेक प्रयत्नांनंतरच ती व्यक्ती स्वतःला अजगराच्या तावडीतून मुक्त करू शकते.
advertisement
advertisement
शेवटी तुम्हाला दिसेल की त्या व्यक्तीने अजगराचा जबडा पूर्णपणे उघडला, ज्यामुळे त्याला अजगराच्या तावडीतून सुटण्यासाठी मदत मिळाली.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर therealtarzann नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला अनेक वेळा पाहिलं गेलं आहे आणि लोक त्यावर भरभरुन कमेंट्स करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 02, 2024 3:05 PM IST


