रात्रीचे 11.45 वाजले, चेन तुटली, ती घाबरली… पण रॅपिडो कॅप्टन ठरला हिरो; तरुणीने सांगितला मध्यरात्रीचा अनुभव

Last Updated:

रात्रीची राईड ही वेगळीच गोष्ट असते. सगळीकडे अंधार, अनेक गल्ली बोळ्यात शांतता आणि मनात लपलेली एक हलकीशी काळजी. अशावेळी एकटी मुलगी असेल तर तिच्या मनात नक्कीच थोडी भीती असते.

बंगळूरु रॅपिडो कहाणी
बंगळूरु रॅपिडो कहाणी
मुंबई : आजकाल शहरात फिरण्यासाठी शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. कुणी स्वतःची बाईक घेतं, कुणी स्कूटरवर अवलंबून असतं तर कुणी रॅपिडो-ओला-उबरवर रोजची ये-जा करतं. पण रात्रीची राईड ही वेगळीच गोष्ट असते. सगळीकडे अंधार, अनेक गल्ली बोळ्यात शांतता आणि मनात लपलेली एक हलकीशी काळजी. अशावेळी एकटी मुलगी असेल तर तिच्या मनात नक्कीच थोडी भीती असते.
एक खरी घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण पूर्ण स्टोरी ऐकून तुम्ही ही सुटकेचा निश्वास सोडाल.
बेंगळुरूची रात्र… आणि 38 किलोमीटरचा प्रवास
बेंगळुरूच्या त्या रात्री, घड्याळात 11:45 वाजत आले होते. शहराच्या लाइटी सुरु झाल्या होत्या. तर रस्ते जवळजवळ मोकळे होते.
आशा माने नावाची मुलगी कामावरून निघाली होती. त्यावेळी तिच्या फोनची बॅटरी फक्त 6% उरली होती, पण घरी पोहोचणं गरजेचं होतं. म्हणून तिने 38 किमी साठीची रॅपिडो राईड बुक केली.
advertisement
थोड्याच वेळात पिवळ्या जॅकेटमध्ये एक रॅपिडो कॅप्टन समोर आला. डोळ्यांत जबाबदारी, चेहऱ्यावर साधं स्मित. त्याला पाहून आशा म्हणाली, “मला लवकर घर पोहोचायचं आहे.” कॅप्टन शांतपणे म्हणाला, “चिंता करू नका मॅडम. मी पोहोचवतो.” आणि प्रवास सुरू झाला.
शहराच्या रिकाम्या रस्त्यांवर बाईक वेगाने पुढे जात होती. पण अचानक समोर एक खड्डा आला, त्यावर बाईक उडाली आणि पुढच्याच क्षणी जोरात टक् असा आवाज, खरंतर यावेळी बाईकची चेन तुटली होती. रात्रीची शांत… रस्ता सुनसान… एकाही दुकानाचा दिवा नाही, एकही वाहन नाही.आणि फोनमध्ये 6% बॅटरी. आता आशा फारच घाबरली होती.
advertisement
आशा मनात म्हणाली, “आता तो राईड कॅन्सल तर करणार नाही ना? मी पुन्हा अंधारात एकटी पडेन का?”
पण कॅप्टनचं पुढचं वाक्य तिच्या अपेक्षेपेक्षा वेगळंच होतं. ते म्हणाला, “घाबरु नका मॅडम. आपण व्यवस्थित करून घेऊ. मी तुम्हाला घरी सोडल्याशिवाय जाणार नाही.” हे वाक्य ऐकून तिच्या मनाला शांती मिळाली आणि जिवाची घालमेल थांबली.
advertisement
आशाने फोनची टॉर्च लावली.
कॅप्टन रस्त्याच्या कडेला बसून चेन दुरुस्त करू लागला. ना राग, ना चिडचिड, ना घाई. या प्रसंगाबद्दल सांगताना आशा म्हणाली, “कोणतीही तक्रार नाही, कोणताही राग नाही… फक्त दोन अनोळखी माणसं अर्ध्या रात्री एकमेकांवर विश्वास ठेवून एक काम पूर्ण करत होती.”
सुमारे 10 मिनिटांत बाईक परत चालू झाली. कॅप्टन उठला, हात झाडले आणि पुन्हा तोच साधा स्मित करत “चला मॅडम, तुम्हाला घरी पोहोचवतो” आणि त्याने वचन पाळलं. रात्री 1 वाजता आशा सुरक्षित घरी पोहोचली.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Asha Mane (@ashamane_)



advertisement
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आशानं या घटनेबद्दल सोशल मीडियावर सांगितलं. तिची ही कहाणी हजारो लोकांनी शेअर आणि लाईक केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच रॅपिडोकडून उत्तर आलं “सर्व हिरो कॅप घालत नाहीत. काही 12:50 वाजता अंधारात चेन दुरुस्त करून कोणाला सुरक्षित घरी पोहोचवतात.”
त्यांनी त्या कॅप्टनचा विशेष सन्मान करण्याची घोषणा केली आहे. ही फक्त राईड नव्हती… ही होती माणुसकीची गोष्ट आहे. कधी कधी सुरक्षा रस्त्यांमुळे नाही मिळत. तर ती एखाद्या माणसाच्या नीयतीमुळे, त्याच्या चांगुलपणामुळे आणि आपल्या सुरक्षिततेबद्दलच्या त्याच्या काळजीमुळे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
रात्रीचे 11.45 वाजले, चेन तुटली, ती घाबरली… पण रॅपिडो कॅप्टन ठरला हिरो; तरुणीने सांगितला मध्यरात्रीचा अनुभव
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement