Mumbai Local Train Video Viral: तुझ्या प्रेमाचे कौतुक करायचे की चोप द्यायचा...; वेस्टर्न रेल्वेवरील धोकादायक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Mumbai Local Video Viral: मुंबईच्या रेल्वे ट्रॅकवर एक तरुणाने जीव धोक्यात घालून लोकलमध्ये चढण्याचा थरारक स्टंट केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.
मुंबई: मुंबईकरांना लोकलचा प्रवास कसा असतो हे सांगण्याची गरज नाही. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये शिरण्यासाठी देखील संधी मिळत नाही. अशा वेळी अनेक जण धोकादायकरित्या प्रवास करतात. असा प्रवास करत असताना अनेक जण गाडी पकडण्यासाठी फलाटावर उभे न राहता. त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या रुळाजवळ थांबतात आणि लोकलमध्ये प्रवेश करतात. अशा पद्धतीने लोकल पकडणे जीवघेणे ठरू शकते. रेल्वे प्रशासनाकडून याबाबत अनेकदा आवाहन करून देखील असे धाडस अनेक जण करतात. मुंबई लोकलमधील असाच एक धोकादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओला अनेकांनी लाईक देखील केले आहे आणि त्याचे उत्तर व्हिडिओच्या शेवटी मिळते.
घटना काय घडली?
मुंबईच्या वेस्टर्न रेल्वे मार्गावर घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ आहे. एका व्यक्तीने प्लॅटफॉर्मवरून नव्हे, तर प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत उडी मारून थेट विरुद्ध दिशेच्या ट्रॅकच्या मधील लोखंडी तटबंदीला टेकून उभा आहे. तेवढ्यात एक लोकल ट्रेन येते. हा व्हिडिओ पाहताना असे वाटते की संबंधित व्यक्ती लोकलमध्ये चढण्यासाठी जागा मिळत नाही म्हणून तो तिकडे उभा आहे. पण जेव्हा लोकल स्टेशनवर येऊन थांबते. तेव्हा तो महिलांच्या डब्यातील दाराजवळ उभ्या असलेल्या एका महिलेला स्वत:ची बॅग देते आणि धावत जाऊन दुसऱ्या जनरल डब्यात चढतो. संबंधित व्यक्ती डब्याच्या आत जाईपर्यंत महिला तो नीट लोकलमध्ये चढला की नाही हे पाहताना दिसते. या कृत्यातून दोघांचे एकमेकांबद्दलचे प्रेम दिसते. मात्र अशा पद्धतीने जीव धोक्यात घालून स्टंट केल्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
advertisement
advertisement
प्रेम की मूर्खपणा?
या घटनेचा व्हिडिओ ‘ aamchi_mumbai_’ या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. त्याला Best Moment 😍 असे कॅप्शन दिले आहे. पण अनेक नेटिझन्सनी हे वागणे "प्रेम नसून मूर्खपणा आणि जीवाशी खेळ" असल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे.
नेटिझन्सचा संताप
व्हिडिओवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एक युजर म्हणतो, Whats there to romanticize this! दुसऱ्याने लिहिले, Worng practice. अनेकांनी यावर कमेंट करत युवकांच्या अशा वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
ही घटना नेमकी कोणत्या रेल्वे स्थानकावरील आहे स्पष्ट होत नाही. वेस्टर्न रेल्वेकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अशा प्रकारच्या कृतीमुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 06, 2025 8:55 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Mumbai Local Train Video Viral: तुझ्या प्रेमाचे कौतुक करायचे की चोप द्यायचा...; वेस्टर्न रेल्वेवरील धोकादायक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल