कोणत्या झाडापासून मिळतो साबूदाणा? अनेकांना माहित नाही याचं उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण साबुदाणा हा डायरेक्ट शेतात तयार होणारा किंवा झाडावर उगणारा पदार्थ नाही. तर तो एका प्रकारच्या झाडाच्या आतून येणाऱ्या पदार्थापासून बनवला जातो.
मुंबई : उपवासाला खाल्ली जाणारी आणि सर्वांची आवडती साबुण्याच्या खिचडीला तोडच नाही. अनेकांना ती उपवासा शिवाय खायला आवडते. तर काही लोक त्या खिचडीसाठी उपवास करतात. पण तुम्हाला माहितीय हे साबुदाणे कुठे आणि कसे तयार होतात?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण साबुदाणा हा डायरेक्ट शेतात तयार होणारा किंवा झाडावर उगणारा पदार्थ नाही. तर तो एका प्रकारच्या झाडाच्या आतून येणाऱ्या पदार्थापासून बनवला जातो. या झाडाचं नावं सागो पाम आहे.
साबुदाणा हा सागो पाम नावाच्या झाडाच्या देठापासून काढलेल्या चिकापासून बनवला जातो. साबुदाण्याचे झाड ताडाच्या झाडासारखे आहे. ही वनस्पती मूळची पूर्व आफ्रिकेची आहे. या झाडाचे खोड जाड झाल्यावर त्याचा मधला भाग कापून त्यापासून चिक काढून त्याची पावडर बनवतात.
advertisement
यानंतर, ही पावडर चाळली जाते आणि गरम केली जाते, जेणेकरून पावडर ग्रॅन्युल्स तयार होतात. ज्या कच्च्या मालापासून साबुदाणा तयार केला जातो त्याला टॅपिओका रूट म्हणतात.
अशा प्रकारे साबुदाणा बनवला जातो
टॅपिओका स्टार्च कसावा नावाच्या कंदापासून बनवला जातो. कसावा रताळ्यासारखा दिसतो. कसावाचं देखील चिक काढून त्याला मोठ्या भांड्यात आठ ते दहा दिवस ठेवलं जातं. या काळात त्यात रोज पाणी टाकले जाते. यानंतर, त्यातून तयार झालेला चिक मशीनमध्ये टाकला जातो आणि अशा प्रकारे साबुदाणा तयार केला जातो.
advertisement
ते सुकल्यानंतर ग्लुकोज आणि स्टार्चपासून बनविलेली पावडर टाकून त्याला पॉलिश केले जाते. अशा प्रकारे पांढऱ्या मोत्याच्या दाण्यांसारखा दिसणारा साबुदाणा तयार होतो.
सागोचे उत्पादन भारतात पहिल्यांदा सेलम, तामिळनाडू येथे झाले. 1943-44 मध्ये कुटीर उद्योग म्हणून त्याची निर्मिती झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 12, 2024 4:28 PM IST







