Weird Food : वर्षभराच्या तेलात विक्रेत्यानं बनवला पराठा, व्हिडीओ पाहूनच येईल 'हार्ट अटॅक'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरात खाण्याचे अनेक वेगवेगळे फ्युजन फूड पहायला मिळतात. आजकाल मार्केटमध्येही अनेक निराळे खाद्यपदार्थ ट्रेंडमध्ये असतात. अशातच विक्रेते ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी काहीतरी हटके आणि युनीक करण्याचा प्रयत्न करतात.
नवी दिल्ली : जगभरात खाण्याचे अनेक वेगवेगळे फ्युजन फूड पहायला मिळतात. आजकाल मार्केटमध्येही अनेक निराळे खाद्यपदार्थ ट्रेंडमध्ये असतात. अशातच विक्रेते ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी काहीतरी हटके आणि युनीक करण्याचा प्रयत्न करतात. आणि ग्राहकही अशा ट्रीक्सला भाळतात आणि विक्रेत्यांकडे गर्दी करतात. सोशल मीडियावर असे फूडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक पराठ्याचा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
पराठा तर तुम्ही खाल्लाच असेल. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पराठे मिळतात. असाच पराठा बनवताना विक्रेत्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. मात्र यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे, विक्रेत्यानं पराठा बनवताना भरभरुन तेल टाकलं. आपण वर्षभरात जेवढं तेल खाऊ तेवढं त्यानं एकाच पराठ्याला वापरलं.
पराठ्याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती पराठा बनवत आहे. तो पहिल्यांदा थोडं तेल पराठ्यावर टाकतो. परत तो पराठ्यावर तेल ओततो. असं तो बऱ्याच वेळा करतो. एवढ्या तेलातला पराठा खाणं म्हणजे हार्ट अटॅक आल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या तेलाचा पराठा पाहून कोणालाही खाऊ वाटणार नाही.
advertisement
Heart Attack Parantha:
The first bite tastes like heaven and the second one takes you there..
pic.twitter.com/EqlbAeaF0e— HasnaZarooriHai (@HasnaZaruriHai) February 23, 2024
इतकं तेल आहे की संपूर्ण पराठा तेलाच्या वर तरंगत असल्याचं दिसतंय. @HasnaZaruriHai नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 25 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवतोय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 24, 2024 7:51 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Weird Food : वर्षभराच्या तेलात विक्रेत्यानं बनवला पराठा, व्हिडीओ पाहूनच येईल 'हार्ट अटॅक'