18 दिवस, 263 किलो सामान... अंतराळातून काय घेऊन परतले शुभांशु शुक्ला? वाचा मिशनची महत्वाची माहिती

Last Updated:

ही टीम फक्त अनुभव घेऊन परत येत नाही, तर स्पेसमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रयोगांचा अमूल्य डेटा आणि वैज्ञानिक उपकरणं घेऊन परत येतेय.

शुभांशु शुक्ला
शुभांशु शुक्ला
मुंबई : जगभरातील अनेक देश आज अंतराळ संशोधनात महत्त्वाचं योगदान देत आहेत. भारतसुद्धा आता केवळ प्रेक्षक राहिलेला नाही, तर महत्त्वाचा भागीदार बनला आहे. याचं जिवंत उदाहरण आहे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला. त्यांच्या टीमने अंतराळात जवळपास 18 दिवस घालवले, त्यानंतर ते सुखरुप पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना कॅलिफॉर्नियाच्या समुद्रात लँडिंग केलं. संपूर्ण भारतासाठी हा गर्वाचा क्षण आहे. सगळीकडे फक्त आणि फक्त शुभांशु शुक्ला यांचीच चर्चा आहे.
ही टीम फक्त अनुभव घेऊन परत येत नाही, तर स्पेसमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रयोगांचा अमूल्य डेटा आणि वैज्ञानिक उपकरणं घेऊन परत येतेय. अंतराळातून नक्की काय आणायला शुभांशु शुक्ला गेले होते? त्यांचं मिशन काय होतं? या सगळ्याची माहिती मात्र अनेकांना माहित नाही. चला त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
NASA च्या माहितीनुसार, हे अंतराळवीर 263 किलोहून (580 पाउंड) अधिक वजनाचं वैज्ञानिक साहित्य आणि डेटा सोबत घेऊन येत आहेत. यात NASA चे महत्त्वाचे उपकरणे आणि 60 पेक्षा जास्त प्रयोगांचे निरीक्षण आणि संशोधनात्मक नोंदी समाविष्ट आहेत. हे सर्व प्रशांत महासागरातील कॅलिफोर्नियाजवळ एका ठराविक बिंदूवर कॅप्सूलद्वारे उतरवण्यात आले आहेत.
advertisement
कोण-कोण होते या मिशनमध्ये?
या मिशनसाठी चार जणांची एक आंतरराष्ट्रीय टीम निवडण्यात आली होती:
advertisement
पायलट: भारताचे शुभांशु शुक्ला (ISRO)
कमांडर: पेगी व्हिटसन (NASA)
मिशन स्पेशालिस्ट: पोलंडचे स्लावोज उज्नान्स्की-विस्नीवस्की
मिशन स्पेशालिस्ट: हंगरीचे टिबोर कापू
या मिशनमुळे भारत, पोलंड आणि हंगरीसारख्या देशांसाठी अंतराळ संशोधनात मोठी झेप घेतल्याचं मानलं जातं.
मिशनचं उद्दिष्ट काय होतं?
या मिशनचं मुख्य उद्दिष्ट जगभरातील 31 देशांनी सुचवलेल्या 60 वैज्ञानिक प्रयोगांचं यशस्वी संचालन आणि त्यातून मिळणाऱ्या डेटाचं संकलन हे होतं. हे प्रयोग अंतराळातील मानव जीवन, आरोग्य, जैविक प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यावर आधारित होते.
advertisement
ड्रॅगन कॅप्सूल 25 जून रोजी NASA च्या कॅनेडी स्पेस सेंटरवरून अंतराळात झेपावलं होतं. 8 जुलै रोजी संध्याकाळी 4:45 वाजता ते ISS (International Space Station) पासून विभक्त झालं आणि आता 15 जुलै रोजी दुपारी 3:01 वाजता पृथ्वीवर परत आलं.
मराठी बातम्या/Viral/
18 दिवस, 263 किलो सामान... अंतराळातून काय घेऊन परतले शुभांशु शुक्ला? वाचा मिशनची महत्वाची माहिती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement