9 वीत शिकणाऱ्या रियाला महिन्याभरात 9 वेळा चावला साप, 22 जुलै नंतर सुरु झाला जीवघेणा खेळ, नक्की हा प्रकार काय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात घडलेल्या एक घटनेनं सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडलं आहे. इथे एका 15 वर्षांच्या मुलीला एका महिन्यातच तब्बल नऊ वेळा सापाने चावा घेतला आहे.
मुंबई : आपण नेहमी सिनेमा किंवा मालिका पाहताना ऐकलं असेल की नाग-नागीण हे आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतात आणि एखाद्या व्यक्तीला येऊन सारखं सारखं दंश करतात. पण खरी गोष्ट अशी आहे की ही एक मान्यता आहे कारण साप हा एक सामान्य प्राणी आहे आणि तो फक्त स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा धोका वाटल्यावर चावतो. पण तो कोणाचा बदला वैगरे घेत नाही.
मात्र, उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात घडलेल्या एक घटनेनं सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडलं आहे. इथे एका 15 वर्षांच्या मुलीला एका महिन्यातच तब्बल नऊ वेळा सापाने चावा घेतला आहे. यानंतर तेथील लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसलं आहे. एका महिन्यातच नऊ वेळा साप चावणं हे काही सामान्य नाही. मग हे कसं घडलं? असा लोकांना प्रश्न पडला आहे.
advertisement
ही घटना सिराथू तहसीलमधील भैंसहापर गावातील आहे. रिया मौर्य नावाची नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिना गेल्या महिन्याभरात नऊ वेळा साप चावला आहे. त्यामुळे तिचं कुटुंब भयभीत झालं आहे आणि संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
रिया चे वडील राजेंद्र मौर्य सांगतात की 22 जुलै 2025 रोजी शेतात जाताना रियाला पहिल्यांदा सापाने चावलं. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि ती बरी झाली. पण 13 ऑगस्टला पुन्हा साप चावला आणि प्रकृती बिघडल्याने तिला प्रयागराजला रेफर करण्यात आलं. तेथूनही त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार करून घेतले.
advertisement
यानंतर 27 ते 30 ऑगस्टदरम्यान अधी अंघोळ करताना, नंतर घरकाम करताना पुन्हा पुन्हा सापानं दंश केला. सततच्या उपचारामुळे कुटुंबाची जमा पूंजी संपली आणि आता ते झाडफूक करणाऱ्यांचा आधार घेत आहेत.
रिया सांगते की तो साप खूप मोठा आहे, काळसर रंगाचा आहे आणि त्यावर हिरव्या रेषा आहेत. चावल्यानंतर साधारण एक तासात ती बेशुद्ध पडते. शुद्धीत आल्यानंतर तिला ती कधी हॉस्पिटलच्या खाटेवर तर कधी तांत्रिकाजवळ असल्याचं कळतं. भीतीपोटी तिचे लहान भाऊ-बहीण आईच्या माहेरी राहायला गेला आहेत.
advertisement
गावकऱ्यांचा आरोप आहे की सूचना देऊनही वन विभागाने अजून साप पकडण्याचा प्रयत्न केलेला नाही, तसेच प्रशासनानेही मदत केली नाही. सीएमओ संजय कुमार यांनी सांगितलं की आरोग्य विभागाची टीम लवकरच गावात पाठवली जाईल.
ही घटना सध्या संपूर्ण कौशांबी जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. प्रश्न एवढाच की प्रशासन कधी जागं होणार आणि या कुटुंबाला भीतीतून मुक्त करणार?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 6:09 PM IST
मराठी बातम्या/Viral/
9 वीत शिकणाऱ्या रियाला महिन्याभरात 9 वेळा चावला साप, 22 जुलै नंतर सुरु झाला जीवघेणा खेळ, नक्की हा प्रकार काय?