झिंग झिंग झिंगाट! चक्क कोंबड्या पितायेत टँगो, म्हणे देशी दारूचा फायदाच झाला!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Poultry Farming: सोलापुरातील शेतकरी चक्क कोंबड्यांना दारू पाजतोय. विशेष म्हणजे कोंबड्यांना दारू पाजल्याने त्यांना कोणताही रोग झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर – एखाद्या माणसाला दारूचे व्यसन जडल्याचे ऐकले असेल. तसेच कुणी दारू पिऊन रोडवर धिंगाणा घातल्याचे देखील पाहिले असेल. मात्र कोबड्यांनी दारु पिल्याचं कधी ऐकलंय का? सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात कोंबड्या चक्क देशी दारू पित आहेत. वाळूज येथील राजेंद्र कादे यांनी आगळावेगळा प्रयोग केला आहे. या प्रयोगामुळे चक्क कोंबड्यांचा जीव देखील वाचला आहे. कादे हे कोंबड्यांना मर रोगापासून वाचवण्यासाठी चक्क देशी दारू पाजत आहे. याबाबत लोकल18 सोबत बोलताना कादे यांनीच माहिती दिलीये.
advertisement
वाळूज गावातील राजेंद्र कादे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. शेती करत जोडून धंदा म्हणून त्यांनी कोंबडी पालन सूरू केले. राजेंद्र यांनी सुरुवातीला 100 कावेरी जातीच्या कोंबड्या आणून या व्यवसायाला सुरुवात केली. काही दिवसांनी त्या कोंबड्यांवर मर नावाचा रोग पडला आणि त्यामुळे 20 कोंबड्या मरण पावल्या. या रोगापासून कोंबड्यांना वाचवण्यासाठी राजेंद्र कादे यांना गावातील एका व्यक्तीने भन्नाट उपाय सूचवला. तो म्हणजे कोंबड्यांना देशी टॅंगो पंच दारू पाजायचा.
advertisement
राजेंद्र कादे यांनी आपल्या लाडक्या कोंबड्याना मर रोगापासून वाचवण्यासाठी देशी दारूच्या दुकानातून जाऊन टँगो पंचची लहानशी बाटली आणली आणि कोंबड्या पाणी पित असलेल्या भांड्यात देशी दारूच्या बाटलीच्या टोपणाने दारू पिण्याच्या पाण्यात टाकली. दारू पिल्याने काही दिवसानंतर मर रोगापासून सर्व कोंबड्यांची सूटका झाली असून तेव्हापासून कोंबड्या मेल्या नाहीत. त्यामुळे आजतगायत राजेंद्र कादे हे आपल्या कोंबड्यांना महिन्यातून 2 ते 3 वेळा पिण्याच्या पाण्यातून देशी दारूच्या बाटलीला असलेल्या टोपणने 4 ते 5 टोपण पाण्यात मिसळून टँगो पंच दारु पाजत आहेत.
advertisement
औषध म्हणून सुरू केली दारू
“कुक्कुटपालन सुरू केल्यानंतर मर रोगाने कोंबड्या मरत होत्या. तेव्हा गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीनं कोंबड्यांना देशी दारू पाजण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून कोंबड्यांच्या पाण्यात 4-5 टोपण देशी दारू टाकत आहे. त्याचा फायदा औषधासारखा झाला असून कोंबड्यांना मर रोग झालेला नाही. कोंबड्या देखील धष्टपुष्ट आहेत. महिन्यातून 2-3 वेळा दारू पाजत आहे,” असे शेतकरी कादे सांगतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
January 19, 2025 8:47 AM IST