ड्रायविंग करताना युट्यूबरचा अती शहाणपणा, Live च्या नादात कोट्यवधींच्या सुपर कारचा चुरा, सगळा प्रकार Video मध्ये कैद
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक युट्यूबर कार चालवताना Live stream करक होता, जेव्हा त्याची एक चूक त्याला भोवली ज्यामुळे त्याच्या कोट्यवधीच्या सुपर कारचा चुरा झाला.
मुंबई : सोशल मीडियावरील काही क्लिक्स आणि व्ह्यूजच्या नादात काही लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात. काही लोक तर यासाठी पाण्यासारखा पैसा घालवतात तर काही लोक आपल्या जीवाची बाजी लावतात. ज्यामुळे त्यांच्या व्हिडीओला व्ह्यूज तर मिळतात, पण कधी कधी अशी प्रकरणे अंगलट येतात. असंच एकाहीसं एका युट्यूबर सोबत घडलं.
एक युट्यूबर कार चालवताना Live stream करक होता, जेव्हा त्याची एक चूक त्याला भोवली ज्यामुळे त्याच्या कोट्यवधीच्या सुपर कारचा चुरा झाला. या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. ज्यामुळे हा व्हिडीओ आता वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत आहे.
जॅक डोहर्टी हा एक लोकप्रिय YouTuber आणि Kickstreamer आहे, मियामीमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान, जॅकने त्याची 1.7 कोटींची सुपरकार मॅक्लारेन रस्त्याच्या कडेला क्रॅश केली. या व्हिडीओमुळे युजर्समध्ये नाराजी आहे.
advertisement
5 ऑक्टोबर रोजी, 20 वर्षीय जॅक पावसात मियामी हायवेवर गाडी चालवत होता. गाडी चालवण्याबरोबरच तो त्याच्या फोनकडेही पाहत होता. यादरम्यान निसरड्या रस्त्यावर कारचा वेग वाढल्याने त्याचे नियंत्रण कारवरुन सुटले.
Jack Doherty just crashed his brand new McLaren on stream https://t.co/WNnKGbmHbD
— FearBuck (@FearedBuck) October 5, 2024
advertisement
व्हिडिओमध्ये जॅकनाही..नाही..नाही म्हणताना तुम्ही ऐकू शकता ज्यानंतर पुढे व्हिडीओमध्ये सुपर कारचा कसा चुरा झाला हे तुम्ही पाहू शकता. लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जी सोशल मीडियावर नंतर वाऱ्यासारखी पसरली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2024 5:42 PM IST
मराठी बातम्या/Viral/
ड्रायविंग करताना युट्यूबरचा अती शहाणपणा, Live च्या नादात कोट्यवधींच्या सुपर कारचा चुरा, सगळा प्रकार Video मध्ये कैद