मासिक पाळी आली म्हणून शाळेने मुलीला दिली 'शिक्षा'! आठवीच्या विद्यार्थिनीसोबत संतापजनक कृत्य

Last Updated:

मीडिया रिपोर्टनुसार, मुलीची मासिक पाळी 5 एप्रिल रोजी पेपर सुरू असताना आली. यानंतर मुख्याध्यापिकेने तिला वर्गाबाहेर बसून परीक्षा देण्यास सांगितलं.

News18
News18
कोइम्बतूर : नोव्हेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने मासिक पाळी स्वच्छता धोरणाला मान्यता दिली. शालेय मुलींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दलची समज वाढवण्यासाठी, त्याबद्दल त्यांच्या विचारसरणीत, वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी हे धोरण आणण्यात आलं. मासिक पाळीच्या वेळी मुलींना शाळेत येण्यापासून रोखणारे अडथळे दूर करणं हा याचा मुख्य उद्देश. असं असताना एका शाळेत मात्र मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीसोबत संतापजनक कृत्य करण्यात आलं आहे.
तामिळनाडूत आठवीच्या दलित मुलीसोबत घडलेला हा प्रकार. ही मुलगी कोइम्बतूरच्या सेनगुट्टैपलयम येथील स्वामी चिद्भवानंद मॅट्रिक उच्च माध्यमिक शाळेत शिकते. मीडिया रिपोर्टनुसार, 5 एप्रिल 2024 रोजी तिची मासिक पाळी आली, तेव्हा तिची परीक्षा सुरू होती. यानंतर मुख्याध्यापिकेने तिला वर्गाबाहेर बसून परीक्षा देण्यास सांगितलं.
advertisement
या घटनेचा 1.22 मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुलगी पायऱ्यांवर बसून परीक्षा देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती मुलगी एका महिलेशी बोलताना ऐकू येते. ती महिला मुलीची आई असल्याचं सांगितलं जात आहे. मुलगी म्हणते, मुख्याध्यापकांनी मला इथे (पायऱ्यांवर) बसून परीक्षा द्यायला सांगितलं. मुलीने असंही सांगितलं की बाहेर बसून परीक्षा देणं असं पहिल्यांदाच घडलेलं नाही. मुख्याध्यापिका मला परीक्षेसाठी वेगळ्या ठिकाणी घेऊन गेली.
advertisement
दरम्यान आईने स्वतः बाहेर बसून परीक्षा देण्यास सांगितलं होतं असा शाळा प्रशासनाचा दावा आहे की मुलीच्या आईला परीक्षेदरम्यान बाहेर बसायचं होतं. आई म्हणाली की, मला फक्त मुलीला वेगळं बसवून परीक्षा द्यायची होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे.
advertisement
तामिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश म्हणाले की, शाळेविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे. कोणत्याही परिस्थितीत मुलांवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाहीत. मुलांवर कोणत्याही प्रकारच्या दबावाबाबत आमचं शून्य सहनशीलतेचं धोरण आहे.
वृत्तानुसार, खाजगी शालेय शिक्षण संचालक डॉ. एम. पलामिसामी यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे. जर काही चुकीचं आढळलं तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
मासिक पाळी आली म्हणून शाळेने मुलीला दिली 'शिक्षा'! आठवीच्या विद्यार्थिनीसोबत संतापजनक कृत्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement