धावत्या गाडीतून आला विचित्र आवाज, बोनेट उघडताच चालक हादरला; पुढे जे दिसलं ते पाहून लोकांना फुटला घाम
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
एका गाडीमधून अचानक विचित्र आवाज येऊ लागल्याने एकच खळबळ उडाली. गाडीच्या बोनेटखाली पाहिल्यावर लोकांनाही धक्का बसला कारण तिथे एक...
जोधापूरच्या लाल सागर रोडवर एकच गोंधळ उडाला, जेव्हा एका धावत्या गाडीतून विचित्र आवाज येऊ लागला. हा आवाज कुठून येत आहे, याचा लोकांना आश्चर्य वाटू लागले. आवाज ऐकून सगळे इकडे-तिकडे पाहू लागले. नंतर जेव्हा लक्षात आले की आवाज गाडीच्या पुढच्या भागातून येत आहे, तेव्हा चालकाने लगेच गाडीचे बोनेट उघडले. बोनेट उघडताच त्याला धक्का बसला. तिथे एकच गोंधळ उडाला आणि लक्षात आले की, तो आवाज एका सापाचा होता, हे पाहून सगळ्यांची घाबरगुंडी उडाली.
धावत्या गाडीतून निघाला साप
धावत्या गाडीतून साप बाहेर आल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. पण गाडीच्या चालकाने शांत डोक्याने काम केले. न घाबरता त्याने आधी गाडी सुरक्षित ठिकाणी थांबवली आणि त्यात बसलेल्या सर्व लोकांना बाहेर काढले. या उन्हाळ्यात असे दृश्य पाहून रस्त्यावरील लोकांनाही धक्का बसला. काही काळ रस्त्यावर एकच खळबळ माजली होती. गाडीच्या चालकाने हुशारीने गाडी थांबवली आणि सर्पमित्र इस्माईल रंगरेज यांनी सापाला सुरक्षित बाहेर काढून जंगलात सोडले.
advertisement
सापाला वाचवून जंगलात सोडले
घटनेची माहिती मिळताच, सर्पमित्र इस्माईल रंगरेज घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी काळजीपूर्वक सापाला गाडीतून बाहेर काढले. इस्माईल रंगरेज यांनी सांगितले की, हा ग्लॉसी बेलीड रेसर स्नेक (Glossy Bellied Racer Snake) प्रजातीचा साप होता, ज्याला वाचवून जंगलात सोडण्यात आले.
उन्हाळ्यात साप थंड आणि सुरक्षित जागा शोधतात
सापाला वाचवल्यानंतर त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. इस्माईल रंगरेज यांनी लोकांना अशा परिस्थितीत न घाबरण्याचे आणि तात्काळ एखाद्या तज्ज्ञाशी किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यांनी असेही सांगितले की, उन्हाळ्यात साप थंड आणि सुरक्षित जागा शोधण्यासाठी अशा ठिकाणी जातात.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 14, 2025 5:05 PM IST
मराठी बातम्या/Viral/
धावत्या गाडीतून आला विचित्र आवाज, बोनेट उघडताच चालक हादरला; पुढे जे दिसलं ते पाहून लोकांना फुटला घाम


