24 तास वाजवतोय राष्ट्रगीत, शेजारी चांगलीच वैतागलीय, यामागचं कारण ऐकून तुम्ही म्हणाल, "काय विचित्रपणा..."

Last Updated:

रशियातील वोल्गोग्राड शहरात एका व्यक्तीने शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी विचित्र मार्ग निवडला आहे. त्याने 24 तास मोठ्या आवाजात देशभक्तीपर गाणी आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज सुरू ठेवले आहेत. या माणसाने...

Viral News
Viral News
प्रत्येकाला आपल्या घरात शांतपणे जगायला आवडतं. दिवसभर काम करून घरी आल्यावर शांत झोप मिळावी अशी अपेक्षा असते. पण, जर उलट घडलं, आणि घरात सतत गोंधळ सुरू असेल, तर कोणी कसं जगणार? रशियातील एका इमारतीतील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांची हीच तक्रार आहे.
देशभक्तीपर गाणी दिवसरात्र वाजतात
ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, रशियातील व्होल्गोग्राड येथील एका निवासी इमारतीमधील एक माणूस त्याच्या विचित्र कृत्यांनी शेजाऱ्यांना त्रास देत आहे. त्याच्या घरात दिवसरात्र देशभक्तीपर गाणी मोठ्या आवाजात वाजतात. जर ती थांबली, तर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज सुरू होतो. यामागचं कारणही रंजक आहे.
दिवसभर देशभक्तीपर गाणी
व्होल्गोग्राडमधील ही इमारत 5 फेब्रुवारीपर्यंत शांत होती, तोपर्यंत एक माणूस शेजारी राहायला आला. आल्यानंतर एक-दोन दिवसातच त्याने मोठ्या आवाजात गाणी वाजवायला सुरुवात केली. तो 24 तास मोठ्या आवाजात देशभक्तीपर गाणी वाजवत असतो. जर ही गाणी थांबली, तर तो त्याजागी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज लावतो. त्यामुळे, संपूर्ण इमारतीत राहणाऱ्या लोकांचं जीवन नरकमय झालं आहे. या संगीत त्रासातून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी पोलिसांनाही बोलवलं, पण कोणीही त्याला थांबवू शकलेलं नाही.
advertisement
यामागचं कारण काय?
इमारतीत राहणारी एक महिला सांगते की, या माणसाने काही वर्षांपूर्वी अपार्टमेंटमध्ये एक खोली विकत घेतली होती. गेल्या वर्षी तो आला आणि म्हणाला की, त्याला संपूर्ण अपार्टमेंट विकत घ्यायचं आहे आणि शेजाऱ्यांना ते विकायला सांगितलं. महिला सांगते की, तिच्याकडे जायला दुसरी जागा नाही, त्यामुळे तिने नकार दिला, तेव्हा त्या माणसाने तिला जीवन नरक बनवण्याची धमकी दिली.
advertisement
दुसऱ्याच दिवशी त्याने एक स्पीकर विकत घेतला, जो तो कुठूनतरी नियंत्रित करतो. पूर्वी तो पॉवर आउटलेटमधून चालवायचा, जे लोक बंद करायचे. त्यामुळे त्याने सौर ऊर्जेवर चालणारी बॅटरी आणली आणि आवाज त्याला जोडला. जेव्हा माध्यमांनी त्या माणसाशी बोलणं केलं, तेव्हा त्याने सांगितलं की, ती महिला त्याच्या घरासमोर कुत्रे ठेवते आणि त्याला त्याच्याच घरात जाऊ देत नाही, ज्याचा तो अशा प्रकारे बदला घेत आहे.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
24 तास वाजवतोय राष्ट्रगीत, शेजारी चांगलीच वैतागलीय, यामागचं कारण ऐकून तुम्ही म्हणाल, "काय विचित्रपणा..."
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement