जिंकणारच नाही असं समजून घेतलेलं तिकीट फेकलं; पण त्याच नंबरने जिंकली 83 लाखाची लॉटरी, अन् मग..

Last Updated:

तिकिट विकत घेतल्यानंतर, त्याला वाटलं की लॉटरी जिंकण्याइतकं आपलं नशीब कुठे आणि त्याने गाडीच्या आतच ते तिकिट कुठेतरी फेकलं

व्यक्तीने जिंकली लॉटरी  (फोटो प्रतिकात्मक)
व्यक्तीने जिंकली लॉटरी (फोटो प्रतिकात्मक)
नवी दिल्ली : नशिबाचा खेळ फार विचित्र आहे, कधीकधी ते असं काहीतरी आपल्या समोर आणतं, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. अनेकदा लोकांना कल्पनाही नसते आणि काही वेळातच ते अचनाक गरिबीतून श्रीमंत होतात. याच कारणामुळे असं म्हटलं जातं, की जेव्हा नशिबाचं नाणं फिरतं तेव्हा व्यक्ती आपोआप वर येऊ लागते आणि हे सर्व पाहून आश्चर्यचकित होते. अशाच एका घटनेची चर्चा सध्या लोकांमध्ये सुरू आहे. यात अचानकच एका चालकाचं नशीब चमकलं.
न्यूयॉर्क पोस्ट या इंग्रजी वेबसाइटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, व्हर्जिनिया येथील रहिवासी जॅचरी क्लेमेंट्स हा डिलिव्हरी ड्रायव्हर आहे. या व्यक्तीचं काम त्याच्या ट्रकमधून इकडे-तिकडे ग्राहक आणि त्यांचं सामान ने-आण करण्याचं होतं. जेणेकरून यातून मिळणाऱ्या पैशातून तो आपलं घर चालवू शकेल. एके दिवशी या व्यक्तीसोबत एक अनोखी घटना घडली. त्याने एका दुकानातून सहजच लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. ते विकत घेतल्यानंतर, त्याला वाटलं की लॉटरी जिंकण्याइतकं आपलं नशीब कुठे आणि त्याने गाडीच्या आतच ते तिकिट कुठेतरी फेकलं आणि तो आपल्या कामात व्यस्त झाला.
advertisement
अशा स्थितीत काही दिवसांपूर्वी तो ट्रक साफ करत असताना त्याला ते तिकीट मिळालं. त्याने एकदा ते स्क्रॅच करून पाहिलं. ते स्क्रॅच करताच त्याचं नशीब पालटलं. त्यानी बसल्या बसल्या 83 लाख रुपयांची लॉटरी जिंकली. त्याने लॉटरी कार्यालयात फोन केला तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलं की तो आता लखपती झाला आहे. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
मीडियाशी बोलताना क्लेमेंट्स म्हणाला की, हे सर्व पैसे मी माझ्या डिलिव्हरीच्या कामात गुंतवणार आहे, जेणेकरून मला माझा व्यवसाय वाढवता येईल. ट्रक ड्रायव्हरसोबत घडलेली ही घटना हे सिद्ध करते की आयुष्यात कधी कधी काही गोष्टी अनपेक्षितपणे येतात
view comments
मराठी बातम्या/Viral/
जिंकणारच नाही असं समजून घेतलेलं तिकीट फेकलं; पण त्याच नंबरने जिंकली 83 लाखाची लॉटरी, अन् मग..
Next Article
advertisement
Tukaram Mundhe: भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात मागणीचं कारण काय?”
BJP आमदारांच्या रडारवर मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात काय होणार?
  • भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात माग

  • भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात माग

  • भाजप आमदारांच्या रडारवर तुकाराम मुंडे, थेट निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात माग

View All
advertisement