...आणि 56 वर्षांच्या केंद्रीय पर्यटन मंत्र्यानं विमानातून घेतली उडी, Video Viral
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पर्यटन मंत्र्यांनी विमानातून उडी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरला, सोशल मीडियावर बहुतांश लोक याबद्दल चर्चा करत आहेत.
मुंबई : देशाचे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी विमानातून उडी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरला, सोशल मीडियावर बहुतांश लोक याबद्दल चर्चा करत आहेत. त्यांनी केलेल्या या कृत्याचं लोक कौतुक करत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विमानातून उडी टाकण्यात कसलं आलंय कौतुक? उलटं कोणीतरी त्यांचे प्राण वाचवायला हवेत.
खरंतर त्यांनी विमानातून स्काय डायविंग केलं आहे, ज्यासाठी पूर्णपणे सेफ्टि सिकॉरिटी घेत त्यांनी उंचावरुन उडी घेतली आहे. असं सांगितलं जातं ती त्यांनी ही उडी सुमारे 1500 फिट उंटावरुन घेतली. त्यांनी वयाच्या 56 वर्षी स्काय डायविंग केली म्हणून ते चर्चेत आले.
खरंतर तरुण मंडळी असं ऐडवेंचर करत असतात. परंतू 56 वर्षी स्काय डायविंग करणं हे खरंत धाडसाचं काम आहे. परंतू केंद्रिय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आपल्या वयाचा विचार न करत आणि आपल्यातील तारुण्य आणि धाडसीपणा जिवंत ठेवत ही उडी घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत एक प्रशिक्षित स्काय डायव्हर ही होता. ज्यांच्यासोबत हा अनुभव घेणं गजेंद्र सिंह शेखावत यांना शक्य झालं.
advertisement
#WATCH नारनौल, हरियाणा: विश्व स्काईडाइविंग दिवस पर केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत ने स्काईडाइविंग की।
(सोर्स: स्काई हाई इंडिया) pic.twitter.com/HFyXvNWr90
— ANI_HindiNews (@AHindinews) July 13, 2024
खरंतर १३ जुलै हा दिवस जागतिक स्काय डायविंग दिन म्हणून साजरा केला जातो, या दिवशी गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्काय डायविंग करत सर्वांची मनं जिंकली, शिवाय ते अनेकांसाठी इन्स्पिरेशन देखील ठरले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 13, 2024 7:58 PM IST
मराठी बातम्या/Viral/
...आणि 56 वर्षांच्या केंद्रीय पर्यटन मंत्र्यानं विमानातून घेतली उडी, Video Viral