VIDEO : जमिनीवर आपटलं, बेल्टने मारलं, शरीरावर चावलं, डेकेअर सेंटरमध्ये 15 महिन्यांच्या मुलीसोबत संतापजनक कृत्य

Last Updated:

Daycare worker beaten child : अवघ्या 15 महिन्यांच्या मुलासोबत डेकेअर वर्करने संतापजनक कृत्य केलं आहे. जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा आला आहे. तळपायाची आग मस्तकात गेली आहे.

News18
News18
नवी दिल्ली : हल्ली बरेच पालक कामावर जातात. घरात मुलांना सांभाळणारं कोणी नसतं. अशावेळी त्या मुलांना डेकेअरमध्ये ठेवलं जात आहे. पण खरंच तुमची मुलं डेकेअरमध्ये सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. कारण डेकेअर सेंटरचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. डेकेअरमध्ये एका मुलासोबत भयंकर प्रकार घडला आहे.
नोएडातील एका डेकेअर सेंटरमधील ही घटना आहे. अवघ्या 15 महिन्यांच्या मुलासोबत डेकेअर वर्करने संतापजनक कृत्य केलं आहे. जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा आला आहे. तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
advertisement
सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की डेकेअर वर्कर मुलाला घेऊन फिरत आहे, परंतु काही वेळाने ती मुलाला वारंवार जमिनीवर टाकते. कॅमेऱ्यात ती महिला मुलाच्या पाठीवर मारतानाही दिसते. इतकंच नाही तर मुलाला चावल्याच्या खुणादेखील आढळल्या आहेत, जे त्याच्या शारीरिक हानीचा पुरावा आहे.
advertisement
पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा मुलाच्या पालकांनी हे पाहिलं तेव्हा त्यांनी ताबडतोब तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी महिलेला अटक करण्यात आली आणि प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये जखमांची पुष्टी झाली. चौकशीनंतर आरोप निश्चित केले जातील आणि आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. यासोबतच, प्रशासनाने इतर डेकेअर सेंटरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत.
advertisement
नोएडा सेक्टर 137 मधील एका सोसायटीत हे डेकेअर सेंटर आहे. जिथं हा संतापजनक प्रकार घडला आहे. त्यामुळे तुमच्या मुलांनाही डेकेअर सेंटरमध्ये टाकताना सांभाळूनच राहा, काळजी घ्या.
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : जमिनीवर आपटलं, बेल्टने मारलं, शरीरावर चावलं, डेकेअर सेंटरमध्ये 15 महिन्यांच्या मुलीसोबत संतापजनक कृत्य
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement