weird food : बाजारात आला निळ्या रंगाचा समोसा, बटाटा नाहीतर आतमध्ये भरलीय ही गोष्ट
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरात अनेक फूडी लोक आहेत. ज्यांना वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला, वेगळ्या ठिकाणी जाऊन खायला खूप आवडतं. भारतात तर खाण्यासाठी लोक काहीही करु शकतात. यामुळे विक्रेतेही आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निराळे फूड व्हर्जन घेऊन येत असतात.
नवी दिल्ली : जगभरात अनेक फूडी लोक आहेत. ज्यांना वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला, वेगळ्या ठिकाणी जाऊन खायला खूप आवडतं. भारतात तर खाण्यासाठी लोक काहीही करु शकतात. यामुळे विक्रेतेही आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निराळे फूड व्हर्जन घेऊन येत असतात. आजकाल तर फूड फ्युजनचा खूप ट्रेंड असून लोक कशातही काही मिक्स करुन पदार्थ बनवतात आणि लोकांना खाऊ घालतात. असाच एक पदार्थ सध्या व्हायरल होतोय. मात्र त्याला पाहूनही तुम्हाला खाण्याची इच्छा होणार नाही.
तुम्ही समोसा खाल्ला असेलच. तुमच्यापैकी अनेकांचा हा आवडीचा पदार्थही असू शकतो. एवढंच नाही तर तुम्ही समोस्याचे अनेक प्रकारही पाहिले असतील मात्र सध्या समोर आलेला समोस्याचा विचित्र प्रकार पाहून तुम्ही डोक्यावरच हात माराल.
ब्लू बेरी समोस्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा समोसा पाहूनच अनेकांना खाण्याची इच्छा होणार नाही. मात्र याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आला आहे.
advertisement
advertisement
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, निळ्या रंगाचा समोसा दिसत आहे. या समोशामध्ये बटाटा-कांदा, वाटाणा किंवा चिकन भरलेले नसून जॅम आणि स्ट्रॉबेरी भरलेलं दिसत आहे. हा ब्लू बेरी समोस्याला त्यांनी निळ्या रंगाचं कोटिंग केलंय. हे पाहूनच कोणाला खाण्याची इच्छा होणार नाही. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून विचित्र कमेंट केल्या आहेत. तर काहींनी म्हटलं एकदा ट्राय करायला हवा. अशा संमिश्र कमेंट व्हिडीओवर येत आहे.
advertisement
youthbitz नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून एका तरुणीनं हा ब्लू बेरी समोसा खाऊन त्याचा रिव्ह्यू दिला आहे. तिला तर अजिबात हाा समोसा आवडला नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 18, 2024 8:35 AM IST
मराठी बातम्या/Viral/
weird food : बाजारात आला निळ्या रंगाचा समोसा, बटाटा नाहीतर आतमध्ये भरलीय ही गोष्ट