ना डायट ना व्यायामाची गरज, भारतात वजन कमी करणारं इंजेक्शन लाँच, किंमत आणि प्रकार लगेच माहित करुन घ्या

Last Updated:

weight loss injection : आता वजन कमी करण्यासाठी डायट किंवा व्यायामाची गरज नाही, इंजेक्शन करणार काम सोपं, भारतात लाँच झालेल्या औषधाची किंमत, फायदा आणि पद्धत जाणून घ्या.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतामध्ये लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे. बदलती जीवनशैली, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेक लोकांना वाढत्या वजनाचा सामना करावा लागत आहे. लठ्ठपणा हा केवळ शारीरिक सौंदर्याचा प्रश्न नसून तो मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांचं मुख्य कारण ठरतो. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी औषधोपचाराची मागणी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर डॅनिश औषधनिर्माता कंपनी नोवो नॉर्डिस्कने भारतात आपलं ब्लॉकबस्टर वजन कमी करणारे औषध 'वेगोवी' (Wegovy) मंगळवारी लॉन्च केलं आहे. हे औषध इंजेक्शन स्वरूपात उपलब्ध असणार आहे, जे दर आठवड्यातून एकदा घ्यावं लागणार आहे.
नोवो नॉर्डिस्क इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत श्रोत्रिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे औषध सध्या वितरण प्रक्रियेत असून जून महिन्याच्या अखेरीस भारतातील फार्मसीमध्ये उपलब्ध होईल.
advertisement
‘वेगोवी’ हे औषध 0.25 मिग्रॅ, 0.5 मिग्रॅ, 1 मिग्रॅ, 1.7 मिग्रॅ आणि 2.4 मिग्रॅ या डोसमध्ये उपलब्ध असणार आहे. सुरुवातीचे तीन डोस (0.25, 0.5, 1 मिग्रॅ) यांची किंमत रु. 4,366 असेल आणि या प्रमाणात एक महिन्याचं औषध घेण्याचा खर्च रु. 17,345 इतका होईल.
त्याचप्रमाणे 1.7 मिग्रॅ डोसची किंमत रु. 24,280 आणि सर्वात उच्च म्हणजेच 2.4 मिग्रॅ डोसची किंमत रु. 26,015 प्रति महिना असेल.
advertisement
‘वेगोवी’ हे औषध लठ्ठपणावर प्रभावी उपचार म्हणून ओळखलं जातं आणि जागतिक पातळीवर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भारतात याची सुरूवात लठ्ठपणाचा त्रास सहन करणाऱ्या अनेक रुग्णांसाठी दिलासा ठरणार आहे. तथापि, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/Viral/
ना डायट ना व्यायामाची गरज, भारतात वजन कमी करणारं इंजेक्शन लाँच, किंमत आणि प्रकार लगेच माहित करुन घ्या
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement