असे जीव जे स्वत:लाच खातात, 99 टक्के लोकांना माहित नसेल याचं उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटत असलं तरी देखील असे काही जीव आहेत, जे भूक लागली आणि अन्न नाही मिळालं तर स्वत:ला खाण्यासाठी देखील मागेपुढे पाहात नाहीत.
मुंबई, 28 नोव्हेंबर : आपल्याला भुक लागली की आपण जेवण करतो. लोक आपल्या आवडी निवडी प्रमाणे वेज किंवा नॉनवेज जेवण जेवतात. प्राण्यांना भूक लागली तर ते आपलं अन्न शोधून किंवा शिकार करुन खातात. विचार करा की तुम्हाला अन्नच नाही मिळालं तर तुम्ही काय कराल? बहुतांश लोक म्हणतील की पाणी पिऊन पोट भरतील किंवा मग अगदीच परिस्थीती आली तर अन्न न मिळाल्यामुळे मृत्यू होऊ शकतो. पण अन्न मिळालं नाही म्हणून स्वत:ला खाण्याची हिंमत कोण करेल?
तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटत असलं तरी देखील असे काही जीव आहेत, जे भूक लागली आणि अन्न नाही मिळालं तर स्वत:ला खाण्यासाठी देखील मागेपुढे पाहात नाहीत.
आज आपण त्या प्राण्याबद्दल बोलू, जो स्वतःला खातो. वास्तविक, अलीकडेच कोणीतरी Quora वर या प्राण्याशी संबंधित प्रश्न विचारला - कोणता प्राणी स्वतःला खातो? यावर लोकांनी काय उत्तरे दिली ते पाहूया.
advertisement
Quora वर लोकांनी काय उत्तर दिले?
एका व्यक्तीने उत्तर दिले की सी स्क्विर्ट्स हे प्राणी आहेत, जे स्वतःचा मेंदू खातात ज्यापासून त्यांना पोषण मिळते. प्राणी जगतातील स्व-नरभक्षकतेचे हे दुर्मिळ उदाहरण आहे.
आता ही सामान्य लोकांची उत्तरे आहेत, त्यामुळे न्यूज18 मराठी हे बरोबर असल्याचा दावा करत नाही. पण सत्य काय आहे हे आपण विश्वसनीय स्त्रोतांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
advertisement
बरोबर उत्तर काय आहे?
या प्राण्यांचे दोन मुख्य प्रकार आहेत, जे स्वतःसारखे इतर प्राणी खातात किंवा जे स्वतःला खातात. बीबीसी वाइल्डलाइफ मॅगझिनच्या रिपोर्टनुसार, चिंपांझी, सिंह, हिप्पो, हॅमस्टर इत्यादी असे अनेक प्राणी आहेत जे त्यांच्याच प्रजातीच्या प्राण्यांना मारून खाऊ शकतात. हे नरभक्षक प्राणी मानले जातात. पण आपण त्या प्राण्यांबद्दल बोलत आहोत जे सेल्फ कॅनिबल म्हणजेच स्वतःला खातात.
advertisement
अॅनिमल पीक आणि व्होकल वेबसाइटच्या अहवालानुसार, या प्राण्यांमध्ये उंदीर साप, सी स्क्विर्ट प्रेइंग मॅन्टिस, हॅमस्टर आणि ऑक्टोपस हे मुख्य प्राणी आहेत. काही जीव भूकेमुळे, तर काहीं तणावामुळे, तर काही संसर्गामुळे असं करतात. जे खूपच आश्चर्यकारक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 28, 2023 5:16 PM IST







