चंद्रावरील मातीत लावलेल्या झाडांचं काय झालं? तिथे शेती करता येईल का? वाचा इन्ट्रेस्टिंग फॅक्ट
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या रिसर्च टीमनेही चंद्राच्या मातीत काही झाडं लावली होती. पण त्यांचं काय झालं?
नवी दिल्ली 18 नोव्हेंबर : अमेरिका आणि चीनसह जगातील अनेक देश चंद्रावर वसाहती स्थापन करण्याचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना तिथे शेती करायची आहे. तिथे जमिनीची खरेदी-विक्रीही सुरू झाली आहे. चीनने तर अंतराळात शेती करण्याचा प्रयत्नही केला. काही बियाही वाढल्या. दुसरीकडे, अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या रिसर्च टीमनेही चंद्राच्या मातीत काही झाडं लावली होती. पण त्यांचं काय झालं? हाच प्रश्न Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विचारण्यात आला. या रंजक प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.
नासाच्या अपोलो मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावरून 382 किलो माती आणली. त्यात चंद्रावरील खडक, कोर नमुने, खडे, वाळू आणि धूळ समाविष्ट होती. फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांना एक रोप लावण्यासाठी फक्त 1 ग्रॅम माती देण्यात आली. संशोधकांनी या मातीत काही झाडं पेरली आणि या मातीत शेती करता येते का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पेरणीनंतर केवळ 2 दिवसांनी बियाणं उगवलं. हे पाहून संशोधकांना आश्चर्य वाटलं. सहसा यासासाठी 4-5 दिवस लागतात.
advertisement
विद्यापीठाच्या प्राध्यापिका अॅना-लिसा पॉल यांनी यावर एक रिसर्च पेपर पब्लिश केला आहे. त्यांनी लिहिलं, आम्ही किती आश्चर्यचकित झालो, हे मी सांगू शकत नाही. 6 दिवस सर्व झाडं सारखीच दिसत होती. पण अचानक खूप काही बदललं. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, प्रोफेसर अॅना-लिसा पॉल म्हणाल्या - 6 दिवसांनंतर चंद्राच्या मातीत उगवलेली झाडं कमकुवत होऊ लागली. त्यांचा विकास थांबू लागला. एक वेळ आली जेव्हा सर्व झाडं नष्ट झाली. भविष्यात मानवांना तिथे राहायचं असल्यास कोणत्या प्रकारचं अन्न आवश्यक असेल हे यावरून ठरलं. तिथे शेती कशी होणार?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2023 9:32 AM IST
मराठी बातम्या/Viral/
चंद्रावरील मातीत लावलेल्या झाडांचं काय झालं? तिथे शेती करता येईल का? वाचा इन्ट्रेस्टिंग फॅक्ट