भारताच्या 'या' राज्यात जमिनीखाली लपलाय हिऱ्यांचा खजीना, 1 ग्रॅमची किंमत ऐकूनच बसेल धक्का
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भारतातील कोणत्या भागातून किंवा राज्यातून जास्त हिरे मिळतात? कोणतं असं राज्य आहे की त्याच्या जमीनीत हिरेच हिरे लपले आहेत?
मुंबई : भारतील जमीनीत चांगले मसाले आणि भाजीपालाच मिळत नाही तर इथून सोनं, चांदी देखील मिळतं एवढंच नाही तर इथून मौल्यवान हिरे देखील सापडतात. जगभरातील प्रसिद्ध किंवा नावाजलेले हिरे हे भारतातच मिळालेला आहे. त्यांपैती एक कोहिनूर हिरा आहे. पण अनेकांना असा प्रश्न नक्कीच पडला असेल की भारतातील कोणत्या भागातून किंवा राज्यातून जास्त हिरे मिळतात? कोणतं असं राज्य आहे की त्याच्या जमीनीत हिरेच हिरे लपले आहेत? चला तर मग जाणून घेऊया भारतातील हिर्यांच्या खाणी, त्यांचा इतिहास आणि आजची स्थिती.
भारतात सर्वाधिक हिरे कुठे मिळतात?
भारतात सर्वाधिक हिरे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात मिळतात. पन्नाला “हिर्यांचे शहर” असेही म्हटले जाते. इथली मझगवां खाण ही देशातील एकमेव औद्योगिक डायमंड माईन आहे, जी नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) चालवते. या खाणीतून दरवर्षी सुमारे 84,000 कॅरेट हिरे मिळतात आणि देशातील सुमारे 90% हिरे इथूनच येतात. 2015 च्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण 31.8 मिलियन कॅरेट डायमंड रिजर्वपैकी 28.7 मिलियन कॅरेट केवळ मध्य प्रदेशात आहेत.
advertisement
आंध्र प्रदेशचा डायमंड इतिहास
कधीकाळी आंध्र प्रदेश (कृष्णा आणि गुंटूर जिल्हे) हे जगातील सर्वात मोठे हिरा केंद्र होते. कोल्लूर खाणीतून कोहिनूर, होप डायमंड आणि ओरलोवसारखे प्रसिद्ध हिरे मिळाले. 16 व्या ते 18 व्या शतकात गोलकुंडा हा जगाचा डायमंड ट्रेड सेंटर होता, परंतु आता मोठ्या प्रमाणावर खाणकाम बंद झाले आहे. तरीही, 2015 मध्ये इथल्या 1.8 मिलियन कॅरेट रिजर्वमुळे आंध्र प्रदेश हा देशातील दुसरा सर्वात मोठा डायमंड स्टेट आहे.
advertisement
छत्तीसगडमध्ये हिर्यांचा खजिना
छत्तीसगडदेखील हळूहळू डायमंड उत्पादनात पुढे येत आहे. इथे 1.3 मिलियन कॅरेट रिजर्व आहेत. रायपूर आणि बस्तर परिसरात किंबरलाइट पाइप्स सापडले आहेत, जे हिर्यांची चांगली शक्यता दर्शवतात. मात्र, इथे अजून खाणकाम लहान प्रमाणातच चालते. भविष्यात हे राज्य मध्य प्रदेशला स्पर्धा देऊ शकते. 2015 च्या IBM डेटानुसार, देशातील 4.1% डायमंड रिजर्व छत्तीसगडमध्ये आहेत.
advertisement
हिर्यांची किंमत कशी ठरते?
हिर्यांची किंमत त्यांच्या गुणवत्तेवर, रंगावर आणि पारदर्शकतेवर अवलंबून असते. साधारणतः 1 ग्रॅम (5 कॅरेट) हिर्याची किंमत ₹10 लाख ते ₹50 लाख किंवा त्याहूनही जास्त असू शकते. मध्य प्रदेशातील पन्न्यात मिळणारे हिरे बहुतांश जेम-ग्रेड (3%) आणि इंडस्ट्रियल-ग्रेड (3%) असतात. गोलकुंडाचा प्रसिद्ध प्रिंसी डायमंड (34.65 कॅरेट) 2013 मध्ये ₹280 कोटींना लिलावात विकला गेला होता.
advertisement
भारतातील डायमंड इतिहास किती जुना आहे?
भारत सुमारे ३,००० वर्षे जगातील एकमेव डायमंड पुरवठादार होता, जोपर्यंत 1726 मध्ये ब्राझीलमध्ये हिरे सापडले नाहीत. गोलकुंडा आणि पन्न्यातील हिरे भारताला जागतिक ओळख मिळवून देत होते. मार्को पोलोसारख्या प्रवाशांनी या हिर्यांच्या कहाण्या युरोपमध्ये पोहोचवल्या. कोहिनूरसारखे हिरे बाबरपासून ब्रिटिश राजवटीपर्यंतच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. आज भारत डायमंड कटिंग आणि पॉलिशिंगमध्ये जगात आघाडीवर आहे, विशेषतः सुरत शहरात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 4:03 PM IST
मराठी बातम्या/Viral/
भारताच्या 'या' राज्यात जमिनीखाली लपलाय हिऱ्यांचा खजीना, 1 ग्रॅमची किंमत ऐकूनच बसेल धक्का