General Knowledge : पांडवांमध्ये कोणाचं लग्न सर्वात आधी झालं? 99 टक्के लोकांना देताच येणार नाही याचं उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्हाला माहीत आहे का, पाच पांडवांपैकी सर्वात आधी कोणाचं लग्न झालं होतं? अनेकांना वाटतं की अर्जुन किंवा युधिष्ठिरचं, पण सत्य काहीसं वेगळंच आहे.
मुंबई : भारतीय संस्कृतीत महाभारत हे केवळ एक ग्रंथ नाही, तर तो जीवनाचा आरसा आहे. यात प्रत्येक पात्रामध्ये दडलेली शिकवण, भावना आणि त्यागाची कथा आजही लोकांना प्रेरणा देते. महाभारतातील प्रत्येक पात्राचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व आहे. मग तो अर्जुन असो, युधिष्ठिर असो किंवा भीम. पण तुम्हाला माहीत आहे का, पाच पांडवांपैकी सर्वात आधी कोणाचं लग्न झालं होतं? अनेकांना वाटतं की अर्जुन किंवा युधिष्ठिरचं, पण सत्य काहीसं वेगळंच आहे.
प्रत्यक्षात पाच पांडवांपैकी सर्वात आधी लग्न झालं ते भीमाचं आणि ज्याच्याशी त्यानं विवाह केला ती होती एका राक्षसी कुलातील कन्या हिडिंबा. ही गोष्ट त्या वेळेची आहे, जेव्हा पांडव लाक्षागृहातून (लाखाचं महाल) बचाव करून वनात भटकत होते. रात्री विसाव्यासाठी ते एका जंगलात थांबले. पण ते जंगल होतं राक्षस हिडिंबचं राज्य. त्याची एक सुंदर बहीण होती हिडिंबा, जिला भीम पाहताच क्षणी आवडला आणि ती त्याच्या प्रेमात पडली.
advertisement
हिडिंबनं आपल्या बहिणीला पांडवांना मारण्याचा आदेश दिला, पण तिनं ते नाकारलं. उलट तिनं भीमाला सगळं सांगितलं आणि आपलं प्रेम व्यक्त केलं. ही गोष्ट कळल्यानंतर भीमनं आपल्या शक्तीने हिडिंबचा वध केला आणि त्यानंतर हिडिंबाशी विवाह केला.
त्या दोघांच्या मिलनातून जन्म झाला एका पराक्रमी पुत्राचा घटोत्कचाचा. तो अर्धमानव आणि अर्धराक्षस होता, पण त्याची निष्ठा आणि शौर्य विलक्षण होतं. महाभारताच्या युद्धात घटोत्कचानं पांडवांच्या बाजूने धैर्याने लढा दिला. शेवटी कर्णाच्या हातून त्याला वीरगती मिळाली. कर्णानं त्यावेळी आपलं सर्वात शक्तिशाली अस्त्र शक्तिबाण घटोत्कचावर वापरलं आणि त्यामुळे अर्जुनचे प्राण वाचले.
advertisement
भीम-हिडिंबा आणि घटोत्कचाची ही कथा आजही महाभारतातील एक रोमांचक आणि भावनिक अध्याय मानली जाते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 9:09 PM IST
मराठी बातम्या/Viral/
General Knowledge : पांडवांमध्ये कोणाचं लग्न सर्वात आधी झालं? 99 टक्के लोकांना देताच येणार नाही याचं उत्तर


