या वर्षी आले 6 चक्रीवादळे, का वाढत आहे देशात विध्वंस? नक्की कारण आहे तरी काय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मोचा, बिपरजॉय, तेज, हमून, मिचली आणि आता मिचॉन्ग असे सहा वेळा वादळं आली. तीन वेळा डिप्रेशन आले.
मुंबई, 04 नोव्हेंबर : वर्ष 2023 आता संपायला आलं आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एक धोकादायक चक्रीवादळ येऊन तामिळनाडूला धडकलं आहे. ज्यामुळे पूर परिस्थीती आली आहे. अनेक सीटी पाण्याखाली गेल्या आहेत. तर गाड्या रस्त्यावर तरंगत आहेत. अनेक रस्त्यांना नदीच रुप आलं आहे. या सगळ्यात एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे ती म्हणजे या एका वर्षांत एकून 6 चक्री वादळे आली आहेत. ज्यामुळे प्रश्न असा उद्भवतो की एका वर्षात एवढा विध्वंस का?
मोचा, बिपरजॉय, तेज, हमून, मिचली आणि आता मिचॉन्ग असे सहा वेळा वादळं आली. तीन वेळा डिप्रेशन आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्तर हिंद महासागरात चक्रीवादळ आले. वर्षाच्या पहिल्या महिन्यातच पहिली चक्री वादळ परिस्थीती तयार झाली.
या वर्षी आलेल्या सर्व चक्री वादळांपैकी मोचा हे सर्वात शक्तिशाली होते. ताशी 215 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. यंदाच्या सहा चक्री वादळांपैकी चार वादळांचे स्वरूप बदलले आहे. प्रथम ते वादळ बनले. मग चक्रीवादळ झाले. यानंतर तीव्र चक्रीवादळ. नंतर अतिशय तीव्र चक्रीवादळ आणि अत्यंत तीव्र चक्रीवादळ बनले. फक्त सुपर सायक्लोनिक वादळ बनायचे ते बाकी होते.
advertisement
या सर्व वादळांमुळे देशभरात एकूण 506 लोकांचा मृत्यू झाला. 20 हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. यावर्षी अरबी समुद्रात एकच वादळ आले. नाव होते बिपरजॉय.
अरबी समुद्र बंगालच्या उपसागरासारखा उबदार नाही. बंगालच्या उपसागरात दरवर्षी दोन-तीन चक्री वादळे आली, तेव्हा अरबी समुद्रात एका चक्रीवादळाचाही जन्म झाला नाही. पण आता अरबी समुद्रही तापत आहे. येथे आणखी तीव्र वादळे येत आहेत.
advertisement
गेल्या 40 वर्षांत अरबी समुद्राचे तापमान प्रत्येक पावसाळ्यापूर्वी 1.4 अंश सेल्सिअसने वाढते. हे जागतिक उष्णतेमुळे म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहे. याशिवाय अरबी समुद्रात चक्रीवादळांची वारंवारता आणि तीव्रता सातत्याने वाढत असल्याचेही शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे.
याआधी अरबी समुद्रातील सर्वात भीषण चक्रीवादळ ताउते हे होते. जे 2021 मध्ये आले होते. अरबी समुद्रातील चक्रीवादळे कमकुवत पातळीपासून सुरू होतात परंतु अचानक ती खूप तीव्र होतात. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमकुवत वादळांचा वेग अचानक वाढतो. याला रॅपिड इंटेन्सिफिकेशन म्हणतात. म्हणजेच आधी वादळाचा वेग कमी असतो, जो 24 तासांत अडीच ते तीन पटीने वाढतो.
advertisement
जर तुम्ही आयपीसीसीचा पाचवा मूल्यांकन अहवाल पाहिला तर त्यात असेही लिहिले आहे की, हरितगृह वायूंमधून बाहेर पडणारी 93% उष्णता महासागर शोषून घेतात. हे 1970 पासून सातत्याने होत आहे. त्यामुळे समुद्र आणि महासागरांचे तापमान वर्षानुवर्षे वाढत आहे. अशा वातावरणामुळे बिपरजॉयसारख्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचा पेव वाढला आहे.
बिपरजॉय सारखी वादळे नेहमी समुद्राच्या उबदार भागांवर तयार होतात, जेथे सरासरी तापमान 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. ते उष्णतेपासून ऊर्जा घेतात आणि महासागरातून ओलावा काढतात.
advertisement
शास्त्रज्ञांनी सांगितले की, भारतातील हवामानाशी संबंधित आपत्तींची माहिती अगोदरच अचूकतेने उपलब्ध आहे. त्यामुळे मदत आणि आपत्ती बचाव पथके योग्य वेळी लोकांना वाचवतात. भारतात खारफुटी वाढली पाहिजे. कारण ते वादळाच्या वेळी पूर आणि उंच लाटांपासून संरक्षण करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2023 9:49 PM IST